Home अकोला देशमुख मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा संपन्न तर युवा मराठा...

देशमुख मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा संपन्न तर युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वप्नील देशमुख यांचा जंगी सत्कार!

126
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_081258.jpg

देशमुख मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा संपन्न तर युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वप्नील देशमुख यांचा जंगी सत्कार!

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ):-अकोला जिल्हा देशमुख मराठा समाज मंडळाच्या वतीने ७ जानेवारी ला डावकीरोड परिसरातील देशमुख समाज मंगल कार्यालयात समाजाचा २५ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय स्नेह सम्मेलन
मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
देशमुख समाज मंडळाचे अध्यक्ष बि.एस. देशमुख तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र भा. देशमुख
वरीष्ठ शाखा प्रबंधक (एल.आय.सी.) मा. श्री किरणरराव सरनाईक (आमदार) ह्यांच्या अध्यक्षतेत तसेच
कार्यक्रमाचे उ‌द्घाटक मा. सौ. अश्विनी शिवशंकर देशमुख (पी.एस.आय.), मा. श्री. राजेशबाप्पु देशमुख (कॉन्ट्रेक्टर)
मा. श्री. स्वप्नील देशमुख (युवा मराठा महासंघ व पत्रकार), श्रीमती देवकाबाई देशमुख (सामाजीक कार्यकर्ता)
विदर्भ अध्यक्ष मधुकरराव देशमुख देशमुख मराठा समाज, संजीव देशमुख (प्रशासकीय अधिकारी, नागपूर),
मा. श्री. निलेश (मंडळाचे उपाध्यक्ष), मा. श्री. प्रदिपराव देशमुख (मंडळाचे सचिव) जिजाऊ ब्रिगेटच्या
विभागीय अध्यक्षा सौ. इंदुताई देशमुख, मा.श्री. संजय देशमुख, मा. श्री. राजेंद्र देशमुख, आदी मान्यवर
उपस्थित होते. प्रथम दिप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज व भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या
प्रतीमेचे पुजनाने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला या वेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील समाज बांधव
मोठ्या संख्येने कार्यक्रमाला मुला-मुलींसह हजर झाले होते. राजेंद्र देशमुख यांनी कार्यक्रमाचे उ‌द्घाटन केले.
मान्यवरांचे शुभ हस्ते २५ वे शुभम भवतु पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. समाज उपयोगी पुस्तिकेच्या
माध्यमातून ७० ते ८० टक्के लग्राचे योग येतात ही मंडळाच्या कामाची पावती आहे. विवाह ही सामाजिक गरज
सोडवण्यासाठी समाजाचे एकत्री करण होणे गरजेचे आहे. मा. श्री. किरणराव सरनाईक (आमदार) यांनी आपल्या
भाषणात सामुहिक विवाह करावे, विविध जिल्हयातील समाज बांधवांना आमंत्रीत करावे, समाजातील
मुलामुलींनी त्यांच्या पालकांनी औद्योगीक व शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करावे. तसेच मा. श्री. संजीव देशमुख
यांनी आपल्या भाषणात समाज बांधवांनी नौकरीच्या मागे न लागता व्यवसाय, लघु उद्योग, करावेत असे मत
व्यक्त केले. यात १४५ उपवर मुला मुलींनी स्वतः परिचय दिले व शुभम् भवतु पुस्तीके मध्ये ११०० ते १२००
मुला मुलींची नाव नोंदणी करण्यात आली. या मुळे समाजाचा खुप मोठा फायदा होऊन लग्र जुळण्यास मदत
होईल. या कार्यक्रमाला १४०० ते १५०० समाज बांधवांची उपस्थिती होती.
मंडळाचे अध्यक्ष मि. एस. देशमुख यांनी प्रस्ताविक करून मंडळाच्या कार्याची माहीती दिली. कार्यक्रमाचे
संचलन कु. सानिका देशमुख व गुरुवर्य जीवनराव देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला आलेल्या सर्व समाज
बांधवांनी भोजनाचा लाभ घेतला. या सोहळ्याला के. एम. देशमुख, प्रदिपराव देशमुख, प्रल्हाद देशमुख, संजय
देशमुख, डॉ. शिवानी देशमुख, विजया देशमुख, अनंतराव देशमुख, राजेंद्र देशमुख, सौ. मालाताई देशमुख,
संजय विजयराव देशमुख, राजाभाऊ देशमुख, श्यामभाऊ देशमुख, अॅड. पियुष देशमुख, श्रीमती जयाताई
देशमुख, दिलीपभाऊ देशमुख, अॅड. पल्लवी देशमुख, मयुर देशमुख, स्वप्नील देशमुख, रविंद्र देशमुख, राजेंद्र
देशमुख प्रदिपराव देशमुख, कार्तिक देशमुख उपस्थित होते. आभार प्रदर्शन शुभम भवतु पुस्तिकेचे संपादक-
राजु देशमुख यांनी यांनी केले.

Previous articleचोरट्यांनी मोटारसायकल अडवत तलवारीचा धाक दाखवून पाच लाखांची रोकड पळवली ▪️ लोहा शहरातील रात्री आठची घटना
Next articleईटगाव गोसेखुर्द पुनर्वसन बाधित क्षेत्रातील समस्या सोडवा ग्रामस्थांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here