Home भंडारा ईटगाव गोसेखुर्द पुनर्वसन बाधित क्षेत्रातील समस्या सोडवा ग्रामस्थांची मागणी

ईटगाव गोसेखुर्द पुनर्वसन बाधित क्षेत्रातील समस्या सोडवा ग्रामस्थांची मागणी

58
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_083914.jpg

ईटगाव गोसेखुर्द पुनर्वसन बाधित क्षेत्रातील समस्या सोडवा ग्रामस्थांची मागणी

आमदार भोंडेकर यांना निवेदन सादर

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) गोसेखुर्द पुनर्वसन बाधित ईटगाव येथील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात याकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर यांना नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले मौजा ईटगाव गावाचे पुनर्वसन मौजा पागोरा येथे झाले असून येथील नागरिकांच्या सुविधा पूर्ण न झाल्यामुळे खालील सुविधा पूर्ण करण्यात याव्यात यात प्रामुख्याने नवीन गावठाणा पासून लाभ क्षेत्राकडे तीन गावाचा मार्ग असल्यामुळे तीन ते चार किलोमीटर रोड पक्का करून देण्यात यावा, ईटगाव, वळद ,निमगाव या तिन्ही गावातील शेतकरी शेती करण्याकरता जातात त्यामुळे पक्का रस्ता करण्यात यावा ,लाभ क्षेत्रामुळे बॅकवॉटरमुळे वाहतूक विस्कळीत होतात त्यामुळे पांदण रस्ता पूर्ण करण्यात यावा, रस्ता पुनर्वसन गावातील सौरऊर्जा एकंदरीत चार ते पाच संपूर्ण बंद आहेत त्यामुळे त्या पूर्ण करण्यात , गावातील डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे चौका चौकातील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे ते पूर्ण करण्यात यावेत पॅकिंग नाल्या लेवल मध्ये नसल्यामुळे निचरा बरोबर होत नाही त्यामुळे त्या पूर्ण करण्यात याव्यात , चालू सरकारने आम्हाला इलेक्ट्रिक बिल माफ करण्याची आश्वासन दिले होते त्याचप्रमाणे घरभाडे माफ करण्याची आश्वासन दिले होते परंतु ते अजून पूर्ण करण्यात आलेले नाहीत त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात यावा, नोकरी ऐवजी वाढीव मोबदला देण्यात यावा इटगाव पुनर्वसन या ठिकाणी बस स्थानक देण्यात यावा, पर्यायी मशान भूमी गोसेखुच्या बॅकवॉटरमुळे बुडीत क्षेत्रात असल्यामुळे मशान भूमीकरता बांधकाम निधी उपलब्ध करून देण्यात यावा, मशीनभूमी कडे जाणारा रस्ता लाभ क्षेत्राकडे जाणारा असल्यामुळे मयत नेताना भरपूर त्रास सहन करावा लागतो त्यामुळे त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी ,इटगाव गावाची पुनर्वसनची सीमांकन पूर्ण करण्यात यावेत, वाढीव कुटुंबाचे पॅकेज देण्यात यावेत, पुनर्वसनाच्या ठिकाणी नागरिक सुविधा पूर्ण करण्यात याव्यात ,वरील समस्याच्या संबंधात पुनर्वसन अधिकारी यांची बैठक बोलावून निराकरण करण्यात यावेत ,आजपर्यंत आम्ही पुनर्वसन अधिकारी लोकप्रतिनिधी कडे अनेकदा समस्याचे निराकरण करण्याकरता निवेदन देण्यात आले परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. आमदार भोंडेकर यांना निवेदन देताना शिष्टमंडळात सरपंच कविता चौधरी, उपसरपंच राजू आंबीलदुके ,ग्रामपंचायत सदस्य लीलाधर मेश्राम ,धर्मदास चौधरी ,सीमा भुरे ,अर्चना चौधरी, भारती कोठारे ,सोमनाथ चौधरी ,अशोक रोहनकर ,शेखर कोठारे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here