Home Breaking News एलसीबीने पकडलेल्या तीन चोरट्यांना देगलूर न्यायालयाने दिली पोलीस कोठडी

एलसीबीने पकडलेल्या तीन चोरट्यांना देगलूर न्यायालयाने दिली पोलीस कोठडी

112
0

एलसीबीने पकडलेल्या तीन चोरट्यांना देगलूर न्यायालयाने दिली पोलीस कोठडी
_____________*___________

नांदेड, दि.१७ ; राजेश एन भांगे
___________*____________

स्थानिक गुन्हा शाखेने पकडून तीन गुन्हेगारांना देगलूर पोलीसांच्या स्वाधीन केले होते. आज दि.16 जून रोजी देगलूर न्यायालयाने तिघांना तीन दिवस अर्थात 19 जून 2020 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

बिदर तुरूंगातून फरार असलेला आरोपी नामदेव रामकिशन भोसले आणि त्याचे दोन साथीदार भास्कर दादाराव चव्हाण तसेच चाफरान पानबाबू भोसले या तिघांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखा पोलीस पथकाने पकडले होते. या तिघांनी चोरीच्या घटना घडवल्याची कबुली दिली होती. देगलूर पोलीसांनी एका चोरी प्रकरणात या तिघांना आज न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीशांनी या तिघांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले. देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास 1.25 ते 1.50 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याच्या तीन घटना अद्याप उघड झालेल्या नाहीत. या तिघांनी या तिन्ही चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.

यानंतर देगलूरचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ठाकुर आणि इतर पोलीस सहकारी या तिन्ही चोरट्यांना घेवून मुखेड येथे गेले. चोरट्यांच्या सांगण्याप्रमाणे तेथील एका सोनाराला त्यांनी चोरीचा ऐवज लुटलेला आहे. वृत्तलिहिपर्यंत सोनाराकडून चोरीचा माल जप्त झाला की, नाही याची माहिती प्राप्त झाली नाही. पण या तिघांनी चोऱ्या केल्याची स्पष्टता झाली आहे.

Previous articleचीन सोबत झालेल्या चकमकीत भारतीचे २० जवान शहीद, तर ४३ चिनी सैनिकाना ठार केल्याची माहिती
Next articleएस टी प्रवाशांच्या पासला मुदतवाढ – परिवहन मंत्री ✍️
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here