Home Breaking News एस टी प्रवाशांच्या पासला मुदतवाढ – परिवहन मंत्री ✍️

एस टी प्रवाशांच्या पासला मुदतवाढ – परिवहन मंत्री ✍️

112
0

🛑 एस टी प्रवाशांच्या पासला मुदतवाढ – परिवहन मंत्री 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील.
परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या पाससाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. ज्यांना या मासिक/ त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटीa महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली आहे. तसेच तशा आशयाचे परिपत्रक महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत निर्गमित करण्यात आले आहे.

22 मार्च 2020 पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परिणामस्वरूप 22 मार्च पुर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक /त्रे मासिक पास काढले होते. परंतु एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही. अशा प्रवाशांच्या पासला सध्या मुदतवाढ देण्यात येणार आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे…⭕

Previous articleएलसीबीने पकडलेल्या तीन चोरट्यांना देगलूर न्यायालयाने दिली पोलीस कोठडी
Next articleलडाखमध्ये चीन सोबत झालेल्या चकमकीत ‘ चीनचे ४३ सैनिक ठार तर ‘भारताचे २० जवान ठार..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here