Home Breaking News आजपर्यंत जगासमोर न आलेला खरा धर्मात्मा….!! मालेगांवच्या संजयभाऊ महालेची कर्तबगारी,दिनदलित गोरगरीबांचे खरे...

आजपर्यंत जगासमोर न आलेला खरा धर्मात्मा….!! मालेगांवच्या संजयभाऊ महालेची कर्तबगारी,दिनदलित गोरगरीबांचे खरे कैवारी! “मोहा फाटाच्या निवारा गृहाला दरवर्षी मदत”

309
0

आजपर्यंत जगासमोर न आलेला खरा धर्मात्मा….!! मालेगांवच्या संजयभाऊ महालेची कर्तबगारी,दिनदलित गोरगरीबांचे खरे कैवारी! “मोहा फाटाच्या निवारा गृहाला दरवर्षी मदत”
मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-नाशिकच्या मालेगांव शहरात स्वप्नपुर्ती नगर भागात वास्तव्यास असलेले पुजा टेन्ट हाऊस,पुजा जलधारा सारख्या व्यवसायाचे संचालक मालक संजय नामदेव महाले पाटील यांनी आपल्या दानशूर कर्तबगारीमुळे गोरगरीबांचे खरे कैवारी असल्याचे सिध्द करुन दाखविले आहे.
वास्तविक संजय नामदेव महाले पाटील यांचे स्वतः चे बालपण अत्यंत खडतर व बिकट परिस्थितीत गेलेले आहे.घरची भयानक गरीबी असतानाही लहानपणापासून सामाजिक सेवेची उर्मी अंगी भिनलेल्या संजय भाऊनी लहानपणी आपल्या उद्योग व्यवसायातील रुपया दोन रुपया बाजुला काढून गोरगरिबांच्या मुलाना शालेय शिक्षणासाठी आर्थिक स्वरुपात मदती केलेल्या आहेत.
संजयभाऊ महाले पाटील यांनी आजवर अनेक सामाजिक क्षेत्रात व विविध प्रकारे गोरगरीब बांधवासाठी झटणा-या संस्था व कार्यकर्त्यांना लाखो रुपयांच्या मदती विविध स्वरुपात केलेल्या आहेत.
कोल्हापूर सांगली सारख्या भागात महापुरग्रस्तांना तातडीचे मदत अन्नधान्यासह लाखो रुपयांची प्रत्यक्षात स्वत हजर राहुन पोहच केली.तर न चुकता निराधार गोरगरीबांना कपडे लते घेऊन देणे.तसेच स्वतः च्या मुलीच्या लग्नकार्यात निराधार व बेसहारा असलेल्या अनाथ मुलांना प्रत्यक्षात व्यासपीठावर उभे करुन त्यांचा नवीन कपडे लते देऊन स्वतः सोबत भोजनाचा मान देणारे संजूभाऊ विरळच अश्या व्यक्ती शोधुनही सापडत नाहीत,संजूभाऊचे कार्य म्हणजे “जे का रंजले गांजले ,त्यासी म्हणावे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” या पध्दतीने संजूभाऊनी बेसहारा व गरीब असलेल्या कुटूंबातील रुग्णांना आर्थिक मदती करणे हा संजयभाऊ महाले पाटील यांचा स्वभाव व उदारदायीत्व बघून महाराष्ट्रातील विविध सेवाभावी संस्था त्यांना सदिच्छा भेट देत असतात.मात्र कनवाळू व दयाळू प्रवृतीचे असलेले संजयभाऊ महाले पाटील यांच्या दानशूर प्रवृतीमुळे त्यांनी आजवर मोहा फाटा ता.जामखेड जि.अहमदनगर येथील निराधार निवारा सारख्या संस्थेला दरवर्षी लहान बालकांसाठी अन्नधान्यासह किराणा बाजाराची आर्थिक मदत लाखो रुपयात केलेली आहे.त्याशिवाय गत दिड वर्षापासून कोरोना महामारी संकटाने उदभवलेल्या भयानक परिस्थितीत संजयभाऊ महाले यांनी पोलिस बांधवाना एक रुपयाचा स्वार्थ न पहाता विनामुल्य गादया,पंखे,पाण्याचे जार,कुलर,व नाश्त्याची सेवा उपलब्ध करुन दिलेली होती.आणि आताच नुकत्याच झालेल्या चिपळूण,महाड रायगड येथील आपादग्रस्तांना मदत करणाऱ्या विविध सामाजिक सेवाभावी संस्थाना मदती तर दिल्यातच त्याशिवाय विविध धार्मिक स्थळांना शेड उभारणी,बांधकाम रंगरंगोटी व भंडारासाठी संजूभाऊनी लाखो रुपयांच्या मदती केल्यात..व खरे अर्थाने गोरगरीब दिनदलित व निराधारांचे कैवारी असल्याचे सिध्द करुन दाखविले.एका बाजुला आमदार,खासदार मंत्री यांच्याकडे मदतीसाठी दारात तासनतास तास ताटकळत उभे राहावे लागते.मात्र संजयभाऊ महाले पाटील यांचेसारख्या उदारदायीत्व असलेल्या दानी व्यक्तीचे कार्य निश्चितच या लोकप्रतिनिधीना लाजविणारे ठरते.आम्हांला हा लेख लिहताना विशेष अभिमान वाटतो की,संजय महाले पाटील हे “युवा मराठा”न्युज चँनलचे कार्यकारी संपादक आहेत. त्यांच्या या विशेष कार्यास आमचा मानाचा सलाम!!आणि संजय भाऊ महाले पाटील यांना सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ देणाऱ्या बंधू तात्याभाऊ महाले पाटील व संजूभाऊच्या सुविद्य पत्नी सौ.उषाताई महाले पाटील,पुतण्या राकेश महाले पाटील,पवन महाले पाटील,आणि पाटील यांचेही कार्य तेवढेच लाखमोलाचे आहे. त्यांनाही आमचा मनपुर्वक मानाचा सलाम!!

लेखन-राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक -युवा मराठा न्युज महाराष्ट्र

Previous articleमोकाट गाढवांमुळे शेतकरी त्रस्त
Next articleपावसाने घर कोसळून आर्थीक नूकसान 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here