Home Breaking News मोकाट गाढवांमुळे शेतकरी त्रस्त

मोकाट गाढवांमुळे शेतकरी त्रस्त

242
0

मोकाट गाढवांमुळे शेतकरी त्रस्त

बूलडाणा :-ब्यूरोचीफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज
वानखेडमध्ये हातावरच्या फोडाप्रमाणे शेतातील पिकांची निगा राखून शेतकरी पीक जपत असतो. ऐन पिकाच्या वाढणीच्या काळात गाढवं शेतातील कपाशी, मूग, उदीद,सोयाबीन या पिकांची नासाडी करत आहेत. काल तर गाढवांनी अर्द्या एकरावरील पर्हाटी फस्त केली, त्यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मोकाट गाढवांचा शेतशिवारातील मुक्त वावर शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरला आहे. तरी या मोकाट गाढवांना ग्रामपंचायत पायबंद घालावा ही मागणी शेतकरी वर्गातून येत आहे. कोंडवाड्यात घातलेले गाढव ग्रामपंचायत एका तासात मुक्त करते, ग्रामपंचायत जवळ त्यांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. उलट गाढव कोंडवाड्याच्या जीर्ण झालेल्या भिंती वरून उड्या मारून पसार होत आहेत.

ग्रामपंचायत मोकाट गाढवांचा बंदोबस्त केव्हा करेल असा सवाल शेतकरी विचारत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here