Home माझं गाव माझं गा-हाणं मालेगांव तालुक्यात ग्रा.पं निवडणूकीत वंचीत बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री..

मालेगांव तालुक्यात ग्रा.पं निवडणूकीत वंचीत बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री..

201

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांव तालुक्यात ग्रा.पं निवडणूकीत वंचीत बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री..!                                                                      मालेगाव: (प्रतिनिधी)नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपले खाते उघडुन प्रस्थापित पक्षांना अनपेक्षित राजकीय धक्का देत अनेक ग्रामपंचायतवर सदस्य विजयी करत बाजी मारली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा व अध्यक्ष ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडीचे नासिकपूर्व कपिलभाऊ आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार उभे केले होते.सदर निवडणूकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने तालुक्यातील पहिल्याच निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणल्याने इतर प्रस्थापित पक्षांना आपले अस्तित्व दाखवून दिले.अजंग,राजमाने,खडकी,जळकु,घाणेगाव आदी ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणले. वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी निवड होऊन अल्पावधी उलटला असला तरी तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ आहिरे, तालुका महासचिव शशिकांत पवार,कोषाध्यक्ष सिद्धार्थ उशिरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.त्यांच्या परिश्रमाने मालेगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे १४ अधिकृत सदस्य,चंदनपुरी येथील शिवमल्हार पॅनलमधून निवडुन आलेले समाधान उशिरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने एकूण सदस्य संख्या १५ झाली आहे.निवडणूक निकालानंतर सर्व विजयी उमेदवारांचा गुलाल उधळून जिल्हाध्यक्ष कार्यालयात पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.सत्काराप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संजय जगताप,जिल्हा सदस्य राजू धिवरे,तालुकाध्यक्ष सुनील आहिरे,महासचिव शशिकांत पवार,कोषाध्यक्ष सिध्दार्थ उशिरे यांच्या सोबत कैलास लोहार,विजय बिऱ्हाडे, कुणाल आहिरे,संतोष बोराळे,किशोर निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.   युवा मराठा न्युज नेटवर्क

Previous articleस्त्री स्वातंत्र्य .किती खरे,किती खोटे?
Next articleनिलेवाडी येथे कोविड योध्दांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.