🛑 लडाखमध्ये चीन सोबत झालेल्या चकमकीत ‘ चीनचे ४३ सैनिक ठार तर ‘भारताचे २० जवान ठार.. 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
लडाख :⭕ वृत्तसंस्था – भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाख जवळच्या सामी रेषेवर गेल्या महिन्याभरापासून संघर्ष सुरु आहे. दरम्यान, चीनी सैन्य आणि भारतीय सैन्यांमध्ये आज झालेल्या झटापटीत 20 जवान शहीद झाले आहेत तर चीनचे 43 सैनिक ठार आणि गंभीर जखमी झाले आहेत. गॅल्वान खोऱ्यात सुरु असलेल्या डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान सोमवारी रात्री दोन्ही सैन्यात झटापट तसेच चकमक झाली. दोन्ही बाजूचे वरिष्ठ अधिकारी सध्या भेट घेऊन यावर चर्चा करती आहेत. दरम्यान चीनने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली असून भारतीय सैनिकांनीच हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी प्राण गमावल्याच चिनने म्हटले आहे.
भारत आणि चीन यांच्या 1962 मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतर 1975 मध्ये LAC वर गोळीबार झाला, त्यात 4 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर एलएसीवर कोणताही संघर्ष झाला नाही. आज जवळपास 45 वर्षानंतर एलएसीवर भारत आणी चीन सैनिकांमध्ये संघर्ष झाला. ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. दरम्यान, चीनचे 43 सैनिक ठार आणि गंभीर झाले आहेत …⭕