Home Breaking News युवती रात्री मालेगाव स्टँड परिसरात पोलिसांना संशयास्पद फिरताना दिसली

युवती रात्री मालेगाव स्टँड परिसरात पोलिसांना संशयास्पद फिरताना दिसली

112
0

🛑 युवती रात्री मालेगाव स्टँड परिसरात पोलिसांना संशयास्पद फिरताना दिसली 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नाशिक :⭕ रात्री अकरा वाजेच्या सुमारास 19 वर्षीय युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याने तिला पंचवटी पोलिसांच्या गस्तीपथकाने ताब्यात घेतले. पंचवटी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर तात्काळ निर्भया पथकाला कळविण्यात आले. निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक संगीता गावित व त्यांच्या पथकाने धाव घेतली. तिच्याकडे विचारणा केली असता ती उडवाउडवी उत्तरे देत होती. त्यानंतर…
पंचवटी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर तात्काळ निर्भया पथकाला कळविण्यात आले. निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक संगीता गावित व त्यांच्या पथकाने धाव घेतली. तिच्याकडे विचारणा केली असता ती उडवाउडवी उत्तरे देत होती. त्यामुळे महिला पोलिस हैराण झाले. अखेरिस तिला महिलांच्या वात्सल्य आधाराश्रमात रवाना करण्याचा निर्णय घेतला. तिची आरोग्य तपासणी करून तिला आधाराश्रमात नेले असता, त्यांनी घेण्यास नकार दिला. त्या मुलीची कोरोना चाचणी करण्यासाठी तपोवनात क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला.

मुलीने सांगितले हे कारण…

हे सारे पाहिल्यानंतर मात्र त्या मुलीला निर्भया पथकाने पुन्हा विचारणा केली असता, ती बोलू लागली. घरातील पाण्याचा नळ चालू राहिला म्हणून आईने रागावले. त्यामुळे 19 वर्षीय मुलीने न सांगता रागाच्या भरात घर सोडले. मात्र रात्रीच्यावेळी निर्भया पोलिस पथकाने तिला ताब्यात घेतल्यानंतर विश्‍वासात घेतल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. पथकाने तिचे समुपदेशन केल्यानंतर तिला तिच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले…⭕

Previous articleलडाखमध्ये चीन सोबत झालेल्या चकमकीत ‘ चीनचे ४३ सैनिक ठार तर ‘भारताचे २० जवान ठार..
Next articleपत्रकार, कॅमेरामँन,आणि मीडियातील इतर कर्मचारी यांना लोकल प्रवासी परवानगी देण्याची मागणी होत आहे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here