Home Breaking News पत्रकार, कॅमेरामँन,आणि मीडियातील इतर कर्मचारी यांना लोकल प्रवासी परवानगी देण्याची मागणी होत...

पत्रकार, कॅमेरामँन,आणि मीडियातील इतर कर्मचारी यांना लोकल प्रवासी परवानगी देण्याची मागणी होत आहे

228

🛑 पत्रकार, कॅमेरामँन,आणि मीडियातील इतर कर्मचारी यांना लोकल प्रवासी परवानगी देण्याची मागणी होत आहे 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ राज्य सरकार आणि केंद्राच्या सहमतीने
शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 15 टक्के तर खासगी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 10 टक्के अनिवार्य असल्याने, अत्यावश्यक सेवा देणऱ्या कर्मचाऱ्यांची प्रवास करण्याची संख्या वाढली आहे.
त्यामूळे राज्य सरकारने केंद्राला मुंबई उपनगरातील काही लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, यामध्ये मंत्रालयातील कर्मचारी, आरोग्य विभाग, महानगरपालीका, पोलीस अशाच कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामधून काही अत्यावश्यक सेवेतील खासगी कर्मचारी, बँक कर्मचारी आणि पत्रकार, कॅमेरामॅन आणि मिडीयातील इतर कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामूळे या कर्मचाऱ्यांना सुद्धा लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसे कदम यांनी ट्विट केले आहे.
पत्रकार अत्यावश्यक सेवेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करतांना पत्रकार सुद्धा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, पत्रकारांना अत्यावश्यक सेवेतील कोणत्याही सुविधा मिळत नसल्याची खंत अनेक पत्रकार संघंटनांनी व्यक्त केली आहे.
पत्रकार सुद्धा कोविड योद्धा
राज्यातील घडामोडीच्या आढावा घेण्यासाठी फिल्डवर बातमीदारी करतांना अनेक पत्रकारांना कोरोनाची लागन झाली होती. त्यानंतर पत्रकारांनी सुद्धा कोरोना विरुद्ध लढाई जिंकून पुन्हा फिल्डवर बातमीदारीसाठी सज्ज झाले आहे. त्यामूळे एक अंगाने पत्रकार सुद्धा कोविड -19 योद्धे आहे.

पत्रकारांना कोव्हिड -19 च्या पार्श्वभुमीवर बातमीदारी करण्यासाठी त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी फिल्डवर जावे लागते, सुरक्षा व्यवस्था सांभाऴून पत्रकार आतापर्यंत बातमीदारी करत आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने पत्रकारांना अत्यावश्यक सेवेत यापुर्वीत सामील करून घेतले आहे. आरोग्य मंत्र्यांनी पोलीस आणि आरोग्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पत्रकारांना सुद्धा 50 लाखांचे विमा कवच देण्याची मागणी मान्य केली आहे. त्यामूळे रेल्वेच्या प्रवासात सुद्धा इतरांना मिळणारी सुविधा पत्रकारांना मिळावी ही मागणी आहे…⭕

Previous articleयुवती रात्री मालेगाव स्टँड परिसरात पोलिसांना संशयास्पद फिरताना दिसली
Next articleमटण-चिकन व्यावसायिकांमध्ये तणाव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.