• Home
  • मटण-चिकन व्यावसायिकांमध्ये तणाव

मटण-चिकन व्यावसायिकांमध्ये तणाव

🛑 मटण-चिकन व्यावसायिकांमध्ये तणाव 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मंचर-⭕आंबेगाव तालुक्‍यातील मंचर, एकलहरे, अवसरी फाटा, पेठ येथे चिकन आणि मटण नवीन व्यावसायिकांनी व्यवसाय थाटल्याने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे, त्यामुळे संबधित दुकानदारांमध्ये ग्राहक खेचण्यासाठी बाजारभावामध्ये घसरण केली असून, या स्पर्धेमुळे त्यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आषाढ महिन्यापासून चिकन, मटण व अंडी व्यावसायिकांच्या व्यवसायाला सुरुवात होते. सोमवार (दि. 22) पासून आषाढ महिना सुरू होत आहे. साधारण एक आठवड्यापूर्वी 220 रुपये किलो दराने मिळणारे चिकन सध्या व्यावसायिक तोटा सहन करत 140 रुपये किलो दराने विकत आहेत, सेच बकऱ्याचे मटण 660 रुपये किलो दराने मिळत होते; परंतु व्यावसायिक स्पर्धेमुळे सद्यःस्थितीत 560 रुपये किलो दराने मंचर व एकलहरे येथे मिळत आहे.
मध्यंतरी चिकन, मटणामुळे करोना होतो, या समाज माध्यमांवरील अफवांमुळे ब्रॉयलर कोंबडीच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

सध्या बहुतांशी ठिकाणी ब्रॉयलर कोंबडीचा माल उपलब्ध असून, या कोंबडीला चांगला बाजारभाव मिळत आहे. सध्याच्या स्थितीत ब्रॉयलर कोंबडी लिफ्टिंग दर किलोला 100 रुपये किलोप्रमाणे आहे. तालुक्‍यातील बहुतांशी गावात किरकोळ चिकन विक्री करणारे व्यावसायिक 170 ते 180 रुपये किलो दराने चिकन विकत आहेत; परंतु मंचर, एकलहरे, पेठ, अवसरी फाटा येथे चिकन व मटणची नवीन दुकाने झाल्याने व्यावसायिक स्पर्धा निर्माण झाली आहे.
जुन्या दुकानदारांनी नवीन दुकानदारांना धडा शिकवण्यासाठी चिकन व मटण विक्रीच्या दरामध्ये घसरण करीत किलोमागे 30 ते 40 रुपयांची तफावत निर्माण केली आहे. मटणाच्या दरामध्येसुद्धा किलोमागे शंभर रुपयांची घसरण केली आहे. तालुक्‍यातील बहुतेक ठिकाणी चिकन, मटणाचे वेगवेगळे दर असल्याने व्यवसायांवर परिणाम होत आहे. दराच्या तफावतीमुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये भांडणे, वाद होऊ लागले आहेत, तर काही ठिकाणी ग्राहकांची मर्जी सांभाळण्यासाठी चिकन, मटणाचे दर तूर्तास कमी केल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेमुळे छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे…⭕

anews Banner

Leave A Comment