Home पुणे यवत पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी खुनाचा गुन्हा आणला उघडकीस

यवत पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी खुनाचा गुन्हा आणला उघडकीस

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0019.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत नागणे यवत पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस तात्काळ अटक..यवत पोलीस स्टेशन गु र नं601/2022 भादविक 302 प्रमाणे दिनांक27/07/22 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचे पती संजय सखाराम बनकर रा तांबेवाडी खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे मूळ राहणार मुरारजी पेठ निराळे वस्ती महादेव मंदिराजवळ चिंच नगर सोलापूर यांना ता27/07/22 रोजी सकाळी 11 वा च्या पूर्वी मौजे यवत गावच्या हद्दीत बाजार तळाच्या जवळ पालखी स्थळ येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने छातीवर व छातीच्या खालच्या बाजूस वार करून खून केला आहे वगैरे माहितीवरून फिर्यादीचा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपास यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण हे करत असताना अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांनी चार टीम तयार केले होत्या त्यामध्ये पोलीस निरीक्षक नारायण पवार व डीबी पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम गुरुनाथ गायकवाड अक्षय यादव यांनी गोपनीय बातमीदार मार्फत आरोपीचे माहिती मिळाली सदर आरोपी हा नेपाळ देशातील रहिवासी आहे अशी माहिती मिळाल्याने सदर आरोपी हा दौंड रेल्वे स्टेशन वरून नेपाळला जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर आरोपीस पकडणे कामी यवत पोलिस स्टेशनचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे तसेच पोलीस हवालदार निलेश कदम गुरुनाथ गायकवाड सचिन घाडगे स्थानिक गुन्हे शाखा तसेच अक्षय यादव बराते यांनी दोन दिवस दौंड रेल्वे टेशन येथे सापळा लावला असता दिनांक 06/08/22 रोजी मध्यरात्री दौंड रेल्वे स्टेशन येथून गुन्ह्यातील आरोपी नामे राजबहादुर बालू सिंग ठाकूर उर्फ राजू सारखी वय47 राहणार यवत तालुका दौंड जिल्हा पुणे मूळ राहणार पहाडीपूर नेपाळ यास ताब्यात घेतले असता त्याने सांगितले कि मी पालखी स्थळावर बसलो असता मयता ने दारू पिऊन मला शिवीगाळ केली व माझ्या कानाखाली चापट मारली म्हणून मी चिडून मयताच्या पोटात चाकू मारून खून केला त्यानंतर गुन्ह्याच्या तपासात खातिर आरोपीस अटक केली सदर गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयाने दिनांक11/08/22 रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास नारायण पवार पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन हे करत आहेत सदरची कार्यवाही मा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस पथकाने केली आहे पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे पोलीस हवालदार निलेश कदम गुरुनाथ गायकवाड अक्षय यादव मारुती बराते तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलीस हवालदार सचिन घाडगे अजित भुजबळ अजय घुले यांच्या पथकाने केली आहे

Previous articleबोरी वालुर या मुख्य रस्त्याची दुरवस्था
Next articleअंधश्रध्देचा असाही प्रकार…! नागपूर हादरले…आई वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here