Home जालना राष्ट्रीय फास्ट फाईव नेटबॉल स्पर्धेकरिता जालना जिल्ह्याच्या आकाश पवार व किरण पाटील...

राष्ट्रीय फास्ट फाईव नेटबॉल स्पर्धेकरिता जालना जिल्ह्याच्या आकाश पवार व किरण पाटील यांची निवड

30
0

आशाताई बच्छाव

राष्ट्रीय फास्ट फाईव नेटबॉल स्पर्धेकरिता जालना जिल्ह्याच्या आकाश पवार व किरण पाटील यांची निवड
जालना/ दिलीप बोंडे ब्युरो चीफ : नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडीया यांच्या वतीने दि. 31 मार्च ते 5 एप्रिल 2023 दरम्यान हरीयाणा येथे पहिली राष्ट्रीय फास्ट फाईव नेटबॉल स्पर्धा आयोजीत करण्यात आली असुन सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचा संघ भंडारा येथुन रवाना झाला असुन महाराष्ट्राच्या संघामध्ये जालन्याच्या दोन खेळाडुंची निवड झालेली आहे. पुरूष संघाचा कर्णधार म्हणुन जालना जिल्ह्याचा नेटबॉल खेळाडु आकाश पवार याला जबाबदारी देण्यात आली आहे तर महिला संघा मध्ये ट्विकंल स्टार इंग्लीश स्कुल बदनापुरच्या क्रीडा शिक्षीका श्रीमती किरण पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. दोन्ही खेळाडुंना जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव शेख चाँद पी.जे. यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र – पुरूष संघ ः आकाश पवार (कर्णधार, जालना), चंदन गायकवाड (उप कर्णधार, नांदेड), राजेश महाले (वाशिम), हनमंत मोरे (पुणे), वैभव ताटे, प्रणव यादव, आशिष गायकवाड (परभणी), शैलेश कुकडे, कार्तिक मरसकोल्हे (भंडारा), सुयश टेकाळे (लातूर), प्रशिक्षक – विलास पराते (भंडारा), व्यवस्थापक – वैभव ढगे (नागपूर)
महीला संघ ः सना शेख (कर्णधार, भंडारा), गायत्री भुसारी (उप कर्णधार, अमरावती), किरण पाटील (जालना), पायल कुंभारकर, सपना टिचकुले, उज्वला चौधरी (भंडारा), वैष्णवी वानखेडे, हनी देशमुख, अश्लेषा गिरी, पूर्वा सरोदे (अमरावती), प्रशिक्षक – यामिनी अरक (अमरावती), व्यवस्थापक – साक्षी कटकवार (भंडारा)
सर्व खेळाडुंची निवड राज्य संघटनेचे अध्यक्ष बिपीनभाई कामदार, सचिव डॉ. ललित जिवानी यांच्यावतीने करण्यात येवुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Previous articleराष्ट्रीय फास्ट फाईव नेटबॉल स्पर्धेकरिता जालना जिल्ह्याच्या आकाश पवार व किरण पाटील यांची निवड
Next articleराष्ट्रीय फास्ट फाईव नेटबॉल स्पर्धेकरिता जालना जिल्ह्याच्या आकाश पवार व किरण पाटील यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here