Home नांदेड इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन

इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन

25
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220619-070612_Google.jpg

इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा जगदविवेक प्रतिष्ठानच्यावतीने 25 जून रोजी सत्कार

बीड प्रतिनिधी
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी वीरशैव लिंगायत समाजातील 75 टक्के पेक्षा जास्त मार्क्स घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जगदविवेक प्रतिष्ठानच्यावतीने सन्मानपत्र भेट देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कारास पात्र असलेल्या महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष विकास विवेक स्वामी आणि सचिव वैभव विवेक स्वामी यांनी केले आहे.
जगदविवेक प्रतिष्ठानचे संस्थापक आदर्श मुख्याध्यापक स्वर्गीय विवेक स्वामी आणि आदर्श मुख्याध्यापिका स्वर्गीय जगदेवी विवेक स्वामी यांच्या स्मरणार्थ जगदेवी स्वामी यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 25 जून 2022 रोजी वीरशैव लिंगायत समाजातील इयत्ता दहावी आणि बारावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. वीरशैव लिंगायत समाजातील ज्या विद्यार्थ्यांना 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत अशा गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या मार्क्स मेमोची एक झेरॉक्स आणि आपला पासपोर्ट फोटो त्याचबरोबर आपले पूर्ण नाव, गाव, तालुका, शाळेचे नाव, आई वडिलांचे नाव टाईप करून 22 जून 2022 पर्यंत 98 22 62 85 21 या व्हाट्सअप नंबर वर पाठवायचे आहेत. इयत्ता दहावी आणि बारावी या वर्गातून जे विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय गुणवत्तेनुसार येतील त्यांना प्रत्येकी 501, 301 आणि 201 रुपयांच्या रोख पारितोषिकासह सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात येईल. इतर पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी सत्कारास पात्र असलेल्या वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींसह गुणवंत विद्यार्थ्यांनी वरील व्हाट्सअप नंबर वर तात्काळ संपर्क साधून सत्कार स्वीकारावा, असे आवाहन जगदविवेक प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष विकास विवेक स्वामी आणि सचिव वैभव विवेक स्वामी ( 98 22 62 85 21 ) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here