Home नाशिक कौळाणेतील रेशन व्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा;मर्जीतल्या व्यक्तीला दुकान दिल्याचा फटका बसतोय...

कौळाणेतील रेशन व्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा;मर्जीतल्या व्यक्तीला दुकान दिल्याचा फटका बसतोय ग्राहकांना…!

128
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230228-102027_Google.jpg

कौळाणेतील रेशन व्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा;मर्जीतल्या व्यक्तीला दुकान दिल्याचा फटका बसतोय ग्राहकांना…!                                मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)- मालेगांव तालुक्यात सध्या रेशन दुकानांमध्ये मोठया प्रमाणावर मनमानी व “हम करे सो” कायदा सुरु असल्याने त्यामुळे त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. याबाबत सविस्तर वृत असे की,एका बाजूला शासनाने वर्षभर नागरिकांना मोफतचे अन्नधान्य देण्याची घोषणा केलेली असली,तरी त्याला हरताळ फासण्याचे व ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार रेशन दुकानदार नव्हे माफीयांकडून सुरु असल्याचे भयानक सत्य चव्हाटयावर आले आहे.मालेगांव तालुक्यातल्या कौळाणे (निं.) या गावी लेंडाणे,ता.मालेगाव येथील दादाजी जगताप नामक व्यक्तीची रेशन व्यवस्था वितरणासाठी नियुक्ती केलेली असल्याने व या व्यक्तीची नियुक्ती पुरवठा विभागातील प्रशांत काथेपुरी यांनी आपला मर्जीतला व्यक्ती म्हणून केली असल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.वास्तविक दादाजी जगताप या व्यक्तीकडे अगोदरच लेंडाणे व पाच डिव्हिजन येथील दुकानाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असल्यामुळे कौळाणे येथील रेशन वितरण करण्याकामी दादाजी जगताप हा कुचकामी ठरत असल्यामुळे ,तेथील रेशन दुकानाचा कार्यभार तात्काळ परिसरातील जवळच्या दुकानादाराकडे सोपविण्यात यावा.अन्यथा याप्रश्नी तहसिलदार कार्यालयासमोर युवा मराठा महासंघाच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरु केले जाईल असा इशारा प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आलेला आहे.दरम्यान मालेगाव तालुक्यात सुरु असलेल्या रेशन दुकानामध्ये मोठाच सावळा गोंधळ सुरु असून,त्यात पुरवठा विभागाचा आर्थिक भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.एक एक दुकानदाराला तीन तीन,चार चार दुकाने बहाल करण्यात आलेली आहेत.तर दुकाने बदलून देण्यासाठी व काढून घेण्यासाठीसुध्दा मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप महासंघाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केलेला असून,त्याला चाप लावण्यासाठीच धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेवटी पत्रकातून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here