Home नाशिक श्रीक्षेत्र वनसगावला प्रदोष सोहळ्यानिमित्त द्राक्ष चर्चा सत्र —

श्रीक्षेत्र वनसगावला प्रदोष सोहळ्यानिमित्त द्राक्ष चर्चा सत्र —

165

आशाताई बच्छाव

1000341886.jpg

श्रीक्षेत्र वनसगावला प्रदोष सोहळ्यानिमित्त द्राक्ष चर्चा सत्र —

अनु दादा मोरे मार्गदर्शन करणार

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड नाशिक प्रतिनिधी

श्रीक्षेत्र वनसगाव तालुका निफाड येथे निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत जगद्‌गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशिर्वादाने व अध्यात्म शिरोमणी उत्तराधिकारी श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने रविवार ५ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता राम विजय क्लिनिक व पॅरॅलिसिस केअर सेंटर वनसगाव संचालक डॉ योगेश डुंबरे यांच्या नियोजनात विश्वनाथ महादेव मंदिर मंदिर वनसगाव येथे भव्य दिव्य प्रदोष सोहळा रामदास यशवंत डुंबरे व सौ जनाबाई रामदास डुंबरे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जय बाबाजी भक्त परिवार वनसगाव व पंचक्रोशीतील भक्त परिवाराने दिली आहे.

*कार्यक्रम रुपरेषा पुढिलप्रमाणे—*
अभिषेक – सायं.०५ ते ०५.३० वा, विधी व महाआरती सायं. ०५.३० ते ०६.०० तसेच सायं ६ ते ७.३० या वेळेत द्राक्ष एप्रिल छाटणी व त्यानंतरचे नियोजन व पाणी नियोजन या विषयावर द्राक्ष पीक मार्गदर्शक अनुदादा मोरे पिंपळगाव बसवंत अध्यक्ष : फ्राटेली ग्रुप फार्मर प्रोड्युसर कंपनी ली. पिंपळगांव बसवंत यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.या चर्चा सत्रानंतर रात्री ७.३० ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी वनसगाव सह पंचक्रोशीतील द्राक्ष उत्पादक शेतकरी, समस्त ग्रामस्थ ,जय बाबाजी भक्त परिवार, तरुण मित्र मंडळ ,वनसगाव भजनी मंडळ आदींनी या चर्चासत्राचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान जय बाबाजी भक्त परिवार व द्राक्ष फ्राटेली ग्रुप, वनसगांव ट्रेकर्स ग्रुप, हनुमान मित्र मडळ कारवाडी, समस्त भजनी मंडळ, रामविजय वॉरिअर्स क्रिकेट क्लब, ओम साई, खंडेराव महाराज ग्रुप व समस्त डुंबरे परिवार आदींनी केले आहे.

Previous articleहरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या हस्ते महेंद्र काळे (पत्रकार)यांचा सत्कार.
Next articleश्रीराम कथा का ऐकावी…? भविष्यात आपल्या समोर भगवंत आले तर त्यांना ओळखता आले पाहीजे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.