Home सामाजिक श्रीराम कथा का ऐकावी…? भविष्यात आपल्या समोर भगवंत आले तर त्यांना ओळखता...

श्रीराम कथा का ऐकावी…? भविष्यात आपल्या समोर भगवंत आले तर त्यांना ओळखता आले पाहीजे

81
0

आशाताई बच्छाव

1000341904.jpg

श्रीराम कथा का ऐकावी…? भविष्यात आपल्या समोर भगवंत आले तर त्यांना ओळखता आले पाहीजे

कथाकार हभप कृष्णा महाराज चाळक 

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड नाशिक प्रतिनिधी

अकाली आपल्या शरीराचा नाश करायचा नसेल, आपले जीवन समाप्त न होण्यासाठी होण्यासाठी श्रोत्यांने श्रीरामायण कथा मनापासुन ऐका. पहिल्या दिवशी श्रीराम काय आहेत हे बघितले. दुसऱ्या दिवशी श्रीराम कथा का ऐकावी हे सांगतांना हिंदु धर्मामध्ये देवाचे १० अवतार सांगितलेले आहे. या दहा अवतारामध्ये मानवी जीवन जगत असतांना फक्त श्रीरामांचे चरित्र आचरण मध्ये आणले पाहीजे, मानवी जीवनासाठी सुलभ आणि सुखकर जगण्यासाठी फक्त श्रीराम यांचे जीवनाचे आचरण केले पाहीजे. यासाठी श्रीराम कथेचे अवलोकन करणे गरजेचे आहे. श्रीराम कोण आहेत, त्या श्रीरामांचे चरित्र आपण आचरणात कसे आणले पाहीजे हे कळुन घेण्यासाठी श्रीराम कथा ऐकली पाहीजे. एक पत्नीव्रत आचरणात आणण्यासाठी श्रीराम कथा ऐकली पाहीजे.
श्रीराम कथा समजुन घेतांना श्रीरामायण कथेतील सात कांड – बालकांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड, सुंदर कांड, लंका कांड, उत्तर कांड असुन या सर्व कांड अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच हे सात कांड समजुन घेण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी श्रीराम कथा ऐकणे गरजेचे आहे. श्रीराम कथा का ऐकली पाहीजे तर भविष्यात आपल्या समोर भगवंत आले तर त्यांना ओळखता आले पाहीजे.
लासलगांव येथील ओमसाई गणेश मित्र मंडळ नंदनगर येथे हभप कृष्णा महाराज चाळक यांच्या सुमधुर वाणीतुन सुरु असलेल्या संगितमय तुलसी रामायण कथेच्या दुसऱ्या दिवशी ग्रथ पुजन आणि आरतीसाठी कैलास भांबरे आणि सुनिता भांबरे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. तसेच कथा संपल्यानंतरच्या आरतीचे मानकरी अनिल सोनवणे व चंद्रकला सोनवणे हे होते. यावेळी लासलगांव व पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. कथेच्या दुसऱ्या दिवशी हभप ऋषिकेश महाराज नवले, हभप माऊली महाराज घनघाव, जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ आदी संतांची उपस्थीती लाभली.
पहिल्या दिवशी श्रीराम कथा काय आहे हे हभप कृष्णा महाराज चाळक यांनी सांगितले तर दुसऱ्या दिवशी श्रीराम कथा का ऐकावी याबाबत मार्गदर्शन केले. श्रीराम कथा का ऐकावी हे सांगत असतांना शिव-पार्वती विवाह, श्रीराम आवताराचे कारण व श्रीराम जन्मोत्सव असे विविध प्रसंग कथन केले. श्रीराम जन्माचा प्रसंग झाकीद्वारे सादर करतांना राजा दशरथ, मंथरा आणि ३ दासी यांचे पात्र दाखविण्यात आले होते यावेळी उपस्थिती सर्व श्रोतेगण मंत्रमुग्ध होवुन श्रीराम जन्मोत्सव सीताराम हनुमान..सीताराम हनुमान, राजा राम राम राम.. राजा राम राम राम, हरी बोल, हरी बोल… प्रभू श्रीरामचंद्र की जय… भजन गात गात नाचुन साजरा केला.

शिव पार्वती विवाह प्रसंग –
जेव्हा शिव आणि पार्वतीचे लग्न होणार होते तेव्हा एक अतिशय सुंदर घटना घडली. त्यांचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. असा विवाह यापूर्वी कधीच झाला नव्हता. शिव – जो जगातील सर्वात तेजस्वी प्राणी होता – तो आणखी एक जीव आपल्या जीवनाचा भाग बनवणार होता. त्याच्या लग्नात लहान-मोठ्या लोकांनी हजेरी लावली होती. तेथे सर्व देवच उपस्थित नव्हते तर राक्षस ही तेथे पोहोचले. साधारणपणे, जिथे देव असतात तिथे राक्षस नसतात आणि जिथे राक्षस जातात तिथे देव जात नाहीत. परंतु भगवान शिव पार्वतीचे लग्न असल्याने लग्नाच्या आदल्या दिवशी ज्यांचे एकमेकांशी अजिबात जमले नाहीत ते एकत्र होते. लग्न शिवाचे होते म्हणुन कट्टर दुश्मन असुनही सर्व भांडणे विसरून एकत्र आले होते. शिव हा पशुपती आहे, म्हणजे तो सर्व प्राणिमात्रांचा देव आहे, म्हणून त्याच्या लग्नाला सर्व देव, दानव, माणसे, प्राणी भूत आणि पिशाचांचेही आणि वेडे पाहुणे देखील आले होते. “शिव हा पशुपती आहे, म्हणजे तो सर्व प्राणिमात्रांचा देव आहे, म्हणून त्याच्या लग्नाला सर्व प्राणी, कीटक आणि सर्व प्राणी उपस्थित होते. त्याच्या लग्नाला भूत आणि वेडेही पाहुणे म्हणून आले होते.”

Previous articleश्रीक्षेत्र वनसगावला प्रदोष सोहळ्यानिमित्त द्राक्ष चर्चा सत्र —
Next articleअजितबाबा चौकात समता सैनिक दल शाखेची स्थापना दिवस साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here