Home अमरावती गो. सी.टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातर्फे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता...

गो. सी.टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातर्फे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी यांना मानाचा मुजरा

48
0

आशाताई बच्छाव

IMG_20240113_194052.jpg

गो. सी.टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातर्फे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी यांना मानाचा मुजरा
चांदूरबाजार,(मयुर खापरे)- स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आज दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र रामटेके, कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व उपस्थिती प्रा.सुनीता तायडे ( वानखडे ) मुख्याध्यापिका कुरळपूर्णा विद्यालय कुरळपूर्णा, तर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. प्रणित देशमुख, एम. सी. व्ही. सी. विभागाचे प्रा. नरेंद्र झाडे प्रामुख्याने व्यासपिठावर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या प्रतिमापूजन व हारार्पनाने स्वागत गीताने करण्यात आली. प्रा. कु. सारिका बर्वे यांनी अतिशय मोजक्या व समर्पक शब्दात कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व उपस्थिती प्रा.सुनीता तायडे ( वानखडे ) मुख्याध्यापिका कुरळपूर्णा विद्यालय कुरळपूर्णा यांचा उपस्थितांना परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. प्रणित देशमुख यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे राष्ट्रनिर्मितीत असलेल्या योगदानाची व कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. सुनीता तायडे ( वानखडे ) यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जीवन कार्याची माहिती देऊन उपस्थितांना उद्बोधन केले,आणि वर्तमान पिढीने दोन्ही विभूतींच्या आचाराविचारातून प्रेरित होऊन आजच्या पिढीने आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करावी असे मत त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले. याप्रसंगी एम. सी. व्ही. सी. विभागाचे प्रमुख नरेंद्र झाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वामी विवेकानंदाच्या आयुष्यातील प्रसंगाची तसेच राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या स्वराज्याच्या उभारणीत केलेल्या कार्याची माहिती अतिशय समर्पक व मोजक्या शब्दात दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पल्लवी धुर्वे तर आभार कु. साक्षी वाळके हिने मानले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अश्विन भुते, प्रा अनिल गांजरे,प्रा. हरीश मोहोकर, प्रा.मुन्ना मावसकर, प्रा. रवी आठवले ,प्रा. रवींद्र इंगळे प्रा. रवी निराळे,प्रा. अंकुश इंगोले, प्रा. वृशाल ठाकरे,प्रा. योगेश सुने प्रा. राहुल दारोकर, प्रा. अभिजित भोजने, प्रा. सागर अहिर, प्रा. कु. मंगला कोल्हे, प्रा कु. अश्विनी चांदेकर तसेच कार्यक्रमाला शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३५ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ
Next articleकौंडण्यपूर पिठाधीश जगद्गुरु राजेश्वर माऊली यांना जीवे मारण्याची धमकी पत्र.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here