Home पुणे शिरूर पोलीस स्टेशन येथे पत्रकारांवर दाखल करण्यात आलेली खोटी N.C.रद्द करून संबंधित...

शिरूर पोलीस स्टेशन येथे पत्रकारांवर दाखल करण्यात आलेली खोटी N.C.रद्द करून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे निवेदन पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले.

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0012.jpg

शिरूर पोलीस स्टेशन येथे पत्रकारांवर दाखल करण्यात आलेली खोटी N.C.रद्द करून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे निवेदन पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले.
पुणे प्रतिनिधी उमेश पाटील
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी यांची चौकशी करून पत्रकारांवर दाखल करण्यात आलेली खोटी N.C.रद्द करण्यात यावी असे निवेदन पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भारतीय पत्रकार संघ लिगल विंग, पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी भारतीय पत्रकार संघ लिगल विंग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.कैलास पठारे, लिगल विंग कायदे सल्लागार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲड. पांडुरंग ढोरे पाटील,लिगल विंग कायदे सल्लागार पश्चिम महाराष्ट्र सचिव ॲड. योगेश तुपे, लिगल विंग पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड.समिर बेलदरे, भारतीय पत्रकार संघ संघटक महाराष्ट्र राज्य अनिल सोनवणे, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर, पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र खुडे, पत्रकार विजय पवार, पुणे शहर अध्यक्ष देविदास बिनवडे , सचिव नामदेव गुटे,शहर संघटक आनंद डहाळे, संदीप खराडे उपस्थित होते.

सविस्तरत माहिती अशी की, संबंधित तक्रारदार महिलेने दिनांक ०३.०२.२०२२ रोजी उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय शिरूर येथे माहीती अधिकार कायदयान्वये कार्यालयीन माहीती मागविली असता माहीती न मिळाल्यामुळे त्याबाबतचे अपिल त्यांनी अपिलीय अधिकारी विनायक ठाकरे उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय यांचेकडे दाखल केले.
परंतु विनायक ठाकरे यांनी माहीती अधिकार कायदयान्वये अपिलात मागणी केलेली माहीती देण्याऐवजी त्यांचे मित्र नवनाथ फरगडे यांचेमार्फत तक्रारदार महिलेला दिनांक २६.०३.२०२२ रोजी फोन करून त्यांचे ऑफीसला बोलावुन घेतले व त्यांचेशी गैरवर्तन केल्याने त्यांनी दिनांक १३.०४.२०२२ रोजी जमाबंदी आयुक्त. आणि संचालक भुमि अभिलेख (म. राज्य) पुणे नि. कु. सुधांशु यांच्याकडे विनायक ठाकरे उपअधिक्षक भूमि अभिलेख शिरूर याच्याविरूध्द लिखित स्वरूपात तक्रार केली आहे. सदर बाबतची बातमी साप्ताहिक जागृत शोध व महाराष्ट्रनामा लाईव्ह पोर्टलनी प्रकाशित केली.
सदर बातमी साप्ताहिक जागृत शोध व महाराष्ट्रनामा लाईव्ह पोर्टलने प्रसिध्द केल्याचा राग मनात धरून विनायक ठाकरे यांनी दिनांक २३.०४.२०२२ रोजी शिरूर •पोलिस स्टेशनला साप्ताहिक जागृत शोध चे संपादक भगवान श्रीमंदिलकर आणि महाराष्ट्रनामा लाईव्ह पोर्टलचे अनिल सोनवणे यांचे विरूध्द तकार दाखल करून N.C. स्वरूपाचा गुन्हा नोंदविलेला आहे. वस्तुतः तसे पाहता शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुरेशकुमार राऊत यांनी लोकशाहीतील चौथ्या स्तंभाविरूध्द आलेल्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतरच गुन्हा नोंदविणे गरजेचे होते.
परंतु शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुरेशकुमार राऊत यांनी साप्ताहिक जागृत शोध चे संपादक भगवान श्रीमंदिलकर आणि महाराष्ट्रनामा लाईव्ह पोर्टलचे अनिल सोनवणे यांचे विरूध्द विनायक ठाकरे उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय शिरूर यांनी दिलेल्या तक्रारीची शहानीशा न करता दिनांक २३.०४.२०२२ रोजी एक्त N.C. स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे.
यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दिनांक २३.०४.२०२२ रोजी साप्ताहिक जागृत शोध चे संपादक भगवान श्रीमंदिलकर आणि महाराष्ट्रनामा लाईव्ह पोर्टलचे अनिल सोनवणे यांचे विरूध्द N.C.स्वरूपाचा गुन्हा नोंदवुन लोकशाही मार्गाने पत्रकारीता करणाऱ्या लोकशाहीचा चौथ्या
स्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांनी सदर N.C. दाखल करून लोकशाही मार्गाने कार्य करणाऱ्या व समाजात घडणाऱ्या घटनांची समाजाला माहीती करून देण्यासाठी बातमी प्रसिध्द करण्याच्या कृत्यास लगाम घालण्याचा प्रयत्न केलेला असुन आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सदर प्रकरणात साप्ताहिक जागृत शोध चे संपादक भगवान श्रीमंदिलकर आणि महाराष्ट्रनामा लाईव्ह पोर्टलचे अनिल सोनवणे यांचे विरूध्द विनायक ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून दिनांक २३.०४.२०२२ रोजी N.C. स्वरूपाचा दाखल केलेला असुन या प्रकरणात लक्ष घालुन संबंधितांविरूध्द योग्य ती कार्यवाही करण्याचे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितले की त्या महिलेचा पुरवणी जबाब नोंदवून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य लिगल विंग चे सचिव ॲड. योगेश तुपे पाटील यांनी पत्रकारांच्या वतीने बाजु मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here