Home पुणे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या रुग्णालयातून डिस्चार्जने भाजपची निवडणूकितील ताकद वाढणार … पिंपरी...

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या रुग्णालयातून डिस्चार्जने भाजपची निवडणूकितील ताकद वाढणार … पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचा बालेकिल्ला अभेद्य राहणार

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0051.jpg

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या रुग्णालयातून डिस्चार्जने भाजपची निवडणूकितील ताकद वाढणार … पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचा बालेकिल्ला अभेद्य राहणार                                 पुणे ,(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यांचावर गेल्या दीड महिन्यापासून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
गुरुवारी ०२ जून ला अखेर उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालतून सोडण्यात आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करत फटाके फोडलेत, ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यानंतर राज्यभरातून सर्वपक्षीय नेत्यांसह शहरातील कार्याकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली जात होती.
राज्यातील या दिग्गज नेत्यांनी घेतली भेट:-
आमदार जगताप रुग्णालयात उपचार घेत असताना अनेक दिग्गज नेत्यांनी भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस, भाजाप,शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेतली त्यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपतील नेते प्रविण दरेकर, रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, नारायण राणे, नीलेश राणे, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन देसाई, भाई जगताप, माधुरी मिसाळ, गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, बापू पठारे, चंद्रकांत मोकाटे, आमदार अण्णा बनसोडे, जगदीश मुळिक, भिमराव तापकीर, आझमभाई पानसरे, संजय जगताप, सिनेअभिनेते प्रविण तरडे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची रुग्णालयात येऊन विचारपूस केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी जे महागडं इंजेक्शन विदेशातून आणण्यासाठी मोठी मदत देखील केली होती.

पिंपरी चिंचवड भाजपच्या दृष्टीने मोठं फायद्याचं ठरणार :-

पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात आमदार लक्ष्मण जगताप यांचा मोठा दरारा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पॉवरफुल नेतृत्व म्हणून आमदार जगताप यांच्याकडे पाहिले जाते. 2022 च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आमदार जगताप यांनी भूमिका महत्वाची राहणार आहे. सध्या त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. पण लवकरच ते राजकारणात पुन्हा लवकरच सक्रिय होणार आहेत, असे बंधू शंकरशेठ जगताप यांनी सांगितले. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जगताप भाजपसाठी महत्वाची भूमिका बजावणार आहेत. 2017 साली लक्ष्मण जगताप आणि भाजप आमदार महेश लांडगे या जोडीने सत्तांतर केलं. राष्ट्रवादीच्या हातातून बालेकिल्ला काबीज केला, तो अबाधित ठेवायचा असेल तर आमदार लक्ष्मण जगताप राजकारणात लवकरात लवकर सक्रिय होण पिंपरी चिंचवड भाजपच्या दृष्टीने मोठं फायद्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here