Home गडचिरोली खा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम।

खा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम।

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0048.jpg

खा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम।                                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाती मोर्चाचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसा निमित्त 1 जुलै रोजी सकाळी सेमाना देवस्थान येथे पूजा अर्चना करण्यात आली नंतर विविध सामाजिक, सेवाभावी, जिल्हा मोबाईल मेडिकल युनिट,रुग्णांना फळे वाटप, वृक्षारोपण,शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण असे विविध कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रम:-
1)गडचिरोली येथील सेमाना
देवस्थानामध्ये पूजा-अर्चना
करण्यात आली

2) गडचिरोली मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट देऊन जनसेवेचे अखंड व्रत हाती घेऊन आश्रमातील अनाथ लोकांना आर्थिक मदत देऊन त्यांना शाल श्रीफळ व मिठाई देऊन गोड तोंंड करून त्यांचं सांत्वन केलं.

3) खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते जिल्हा मोबाईल युनिट उद्घाटन करण्यात आले.रुग्णसेवेचे अखंड व्रत हाती घेऊन जिल्ह्यात अतिदुर्गम भाग
म्हणून अहेरी विधानसभेला 1 मोबाईल युनिट,कोरची येथे 1युनिट, दोन मोबाईल बोलोरो युनिट, अशाप्रकारे चार वाहनांचा मोबाईल युनिटांचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.

4) गडचिरोली येथील मूकबधिर विद्यालय मध्ये मूकबधिर विद्यार्थ्यांना भेट देऊन मिठाई वाटप करुन त्यांचे सांत्वन करण्यात आले.

5) कामगार जिल्हा सोसायटी येथे
वृक्षारोपण करण्यात आले

6) स्नेहनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम.

7) महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे रुग्णांना फळेवाटप करण्यात आले.

8) राजीव गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके,नोटबुक,पेनचे वाटप करण्यात आले.

अशा विविध सामाजिक, सेवाभावी, वृक्षारोपण,रुग्णांना फळ वाटप,शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके,नोटबुक चे वाटप अशा विविध उपक्रमाने गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी जनसेवेचे व्रत हाती घेऊन वेगवेगळे कार्यक्रम वाढदिवसानिमित्त साजरे करण्यात आले.
त्या प्रसंगी.खा.अशोकजी नेते.मा.प्रकाशजी गेडाम एस.टि.मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, जिल्हा महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार,महामंत्री प्रमोदजी पिपरे, महिला आघाडी प्रदेश सदस्यां रेखाताई डोळस,माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, विलास पा. भांडेकर, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, देवराव सा.मुद्धमवार,किशोर वाकुडकर,जीतू सोनटक्के, बंडु झाडे,देवदास नागरे, इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या
शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here