Home गडचिरोली सन २०१८-१९ मधील जलयुक्त शिवार योजनेच्या सिमेंट नाला बंधाऱ्यांची अंतिम देयके तात्काळ...

सन २०१८-१९ मधील जलयुक्त शिवार योजनेच्या सिमेंट नाला बंधाऱ्यांची अंतिम देयके तात्काळ अदा करा

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0047.jpg

सन २०१८-१९ मधील जलयुक्त शिवार योजनेच्या सिमेंट नाला बंधाऱ्यांची अंतिम देयके तात्काळ अदा करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची जलसंधारण मंत्री शंकररावजी गडाख यांच्याकडे मागणी

मंत्रालयात मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव डॉक्टर पांढरपट्टे यांची भेट घेऊन अंतिम देयके अदा करण्यासंदर्भात दिले पत्र

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळातील अतिशय महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या २०१८-१९ अंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधकामाची अंतिम देयक सरकारने अजून पर्यंत दिलेली नाही. मा.जिल्हाधिकारी यांचा यासंदर्भातील अहवाल सरकारला प्राप्त असून त्यावरून तातडीने सदर कामांचीअंतिम देयके अदा करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी जलसंधारण विभागाचे मंत्री शंकररावजी गडाख यांचे कडे केली.

याबाबतचे निवेदन मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव डॉक्टर पांढरपट्टे यांना दिले

सन २०१८-१९ अंतर्गत जलयुक्त शिवार योजनेच्या सिमेंट नाला बांधकामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली .सदर कामाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व त्यानुसार सदर कामे पूर्णही करण्यात आली. परंतु covid-19 च्या संचारबंदी मुळे सदर अंतिम कामाची देयके थांबवण्यात आली. परंतु आता ३ वर्षे होऊनही सदर कामाची देयके अदा करण्यात न आल्याने कंत्राटदार मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत. या संदर्भात शासनाने मागितलेली माहिती व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकारला पाठवलेला असून त्यानुसार सरकारने तातडीने कार्यवाही करून या कामांच्या अंतिम देयकाची रक्कम अदा करावी. अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here