Home नाशिक निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६.३० कोटीचा निधी अखेर मंजूर —

निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६.३० कोटीचा निधी अखेर मंजूर —

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20230613-WA0003.jpg

निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६.३० कोटीचा निधी अखेर मंजूर —

आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्या प्रयत्नांना यश–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाल्यामुळे व वैद्यकीय सोयी अभावी ग्रामस्थांना छोट्या छोट्या वैद्यकीय कारणासाठी निफाड नाशिक या ठिकाणी जावे लागत होते.त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत होते त्याबाबत गावातच सुसज्ज असे आरोग्य केंद्र असावे व सर्व वैद्यकीय सोयी उपलब्ध व्हाव्यात साठी भाजपा मंडलाध्यक्ष तथा माजी जि प सदस्य डी के नाना जगताप व भाजपा नाशिक जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ सुवर्णाताई जगताप यांच्याकडे परिसरातील लोकांनी मागणी केली होती.या जागी सुसज्ज आरोग्य केंद्र व्हावे, यासाठी डी के जगताप व सौ सुवर्णा जगताप यांनी वेळोवेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांच्या कडे मागणी केली.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मिशन कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत वरील कामांसाठी मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थान यासाठी ६.३० कोटींचा रुपयांचा निधी मंजूर केला.
लासलगाव भाजप नेते राजाभाऊ चाफेकर,दत्तुलाल शर्मा,मंडल सरचिटणीस निलेश सालकाडे, पंचायत समिती सदस्य संजय भाऊ शेवाळे, महिला मोर्चा अध्यक्षा स्मिताताई कुलकर्णी, सरचिटणीस नितीन शर्मा, भाजपा युवा शहराध्यक्ष निलेश जगताप, निलेश लचके, सुनील नेवगे, धनंजय गांगुर्डे, बापू दरेकर, राजा भोसले, नवनाथ संभेराव, किरण कुलकर्णी, अभिषेक दरेकर, संजय गडाख, शैलजा भावसार, रंजना शिंदे, रूपा केदारे व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी या कामासाठी विशेष परिश्रम घेतले.मुख्य इमारत बांधकाम व प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याबद्दल नामदार भारतीताई यांचे आभार मानले.

Previous articleलासलगाव -विंचूर सह सोळा गाव पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती समितीच्या अध्यक्ष, सचिवांवर कारवाई करा व पाच वर्षाची पाणीपट्टी माफ करा–
Next articleस्त्री ही अविरत कार्य करणारा कुटुंबाचा सशक्त आधार-
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here