Home नाशिक स्त्री ही अविरत कार्य करणारा कुटुंबाचा सशक्त आधार-

स्त्री ही अविरत कार्य करणारा कुटुंबाचा सशक्त आधार-

96
0

आशाताई बच्छाव

IMG-20230613-WA0007.jpg

स्त्री ही अविरत कार्य करणारा कुटुंबाचा सशक्त आधार-

सौ स्मिताताईं कुलकर्णी

दैनिक युवा मराठा 
रामभाऊ आवारे निफाड

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये रुढी परंपरेला फाटा देत आज स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम होत असून जिद्द, चिकाटी, साहस या त्रिसूत्रीच्या बळावर विविध क्षेत्रांमध्ये ती सक्षमपणे कार्य करू शकते. या सामाजिक कार्यक्रमांबरोबरच आपलं कुटुंब आपला परिवार सांभाळून ती सर्वांची काळजी घेत असते परंतु हे करत असताना तिच्या आरोग्याची काळजी ही घेणे घरातील सदस्यांची कर्तव्यच आहे. सद्यस्थितीत महिलांच्या अवाढव्य कामांमध्ये ती इतकी गुरफटून गेलेली आहे की तिला तिच्या आरोग्याची काळजी घेणे अवघड बनत चालले आहे तिचे आरोग्य सांभाळले जावे.याकरिता लासलगाव येथील मैत्री ग्रुपच्या वतीने महिलांच्या शारीरिक आजारासंदर्भात महिला आरोग्यम संवर्धन हा उपक्रम हाती घेऊन महिलांना यातून आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली जावी या संदर्भात विशेष मार्गदर्शन करतांना स्त्री ही कुटुंबाचा अविरत न थकता कार्य करणारा सशक्त आधार आहे असे प्रतिपादन मैत्री ग्रुपच्या सदस्य तथा ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त सौ स्मिताताई कुलकर्णी यांनी केले आहे.
लासलगाव येथे आयोजित आरोग्य धनसंपदा या आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या सामाजिक उपक्रमात उपदेश करताना त्या पुढे म्हणाल्या की,जेव्हा स्त्री तिच्या मानसिक व शारीरिक आजाराकडे दुर्लक्ष करते. उगवत्या सूर्या सोबत सतत व्यस्त असणारी कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेत आपल्या क्षेत्रात ती अखंड कार्य कुशल असते. धावपळीच्या जगात महिला स्वतःची मात्र काळजी घेत नाही ती काळजी घेण्यासाठी तसेच सामाजिक कार्याचे आपण काही देणे लागतो याच भावनेतून लासलगाव मैत्री ग्रुपच्या माध्यमातून लासलगावात सतत सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. महिलांच्या सक्षमीकरणांसह आरोग्य सुविधा वैचारिक सामंजस्य संवाद यासाठी विविधपूर्ण उपक्रम घेण्यात येतात अशी माहिती ब्राह्मण महासंघ विश्वस्त तथा मैत्री ग्रुपच्या प्रमुख स्मिता ताई कुलकर्णी यांनी दिली आहे.
महिला आरोग्य संवर्धन कार्यक्रमांतर्गत महिलांची शारीरिक अंतर्गत सुरक्षा व इतर आजार व उपाय यावर पिंपळगाव बसवंत येथील सरस्वती ताई जाधव यांनी मार्गदर्शन केले. सपनाताई वजरे यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला. मैत्री ग्रुपच्या स्मिताताई कुलकर्णी ,अनिताताई जाधव ,कविता ताई चव्हाण, आरती ताई सोनवणे यांच्या नेतृत्वाने मैत्रेय महिला मंडळ कार्याध्यक्ष अक्षदा जोशी, मैत्री ग्रुपच्या सीमा देशमुख, सोनाली कर्डिले यांच्या आयोजनात आरोग्य संवर्धन कार्यक्रम यशस्वी पार पडला. यावेळी मीना वजरे ,ललिता टरले ,मीरा भागवत, माया डुंबरे ,निर्मला जाधव, उषा जाधव, भारती इंगळे, शोभा इंगळे, सुमनताई खैरे, बेबी आहेर , सुवर्णा आहेर, रजनी कुलकर्णी, राजकन्या बंब, कविता कर्डिले, मनीषा जाधव, मनीषा लुटे, अनिता कहाने, रेखा राई जाते ,सुनीता आहेर, मंगल शिरसाट, अर्चना चव्हाण, जयश्री निकम ,ज्योती निकम, मंगल होळकर ,अश्विनी शिरसाठ, शोभा करपे ,ममता शिरसाट व परिसरातील युवती व महिला उपस्थित होत्या.

Previous articleनिमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६.३० कोटीचा निधी अखेर मंजूर —
Next articleभरत वाल्हेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाट्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here