Home नांदेड दिपक पाटील कानवटे यांच्या विविध समाजपयोगी कामांची तरुणाईला भुरळ..

दिपक पाटील कानवटे यांच्या विविध समाजपयोगी कामांची तरुणाईला भुरळ..

58
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230602-WA0054.jpg

दिपक पाटील कानवटे यांच्या विविध समाजपयोगी कामांची तरुणाईला भुरळ..
अंबादास पाटिल पवार
लोहा, प्रतिनिधि
शहरातील उमद तरुण नेतृत्व दिपक पाटील कानवटे हे नाव सध्या लोहा शहरात सर्वत्र सुपरिचित असे झाले आहे. अवघ्या पंचेविस ते तिशीच्या मधील या तरुणाने नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा विश्वास संपादन करत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय नवतरुण फळीत आपले नाव निर्माण केले आहे. विशेष म्हणजे समाजातील विविध समाजपयोगी कामे करून लोह्यात स्वतःचा ठसा निर्माण करत दीपकने तरुणाईला भुरळ घातल्याचे त्याच्या संघटन कौशल्य वरून दिसून येत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले अधिकारी डॉ. डी. बी. कानवटे यांचे सुपुत्र असलेले दिपक पाटील कानवटे यांनी कोरोना सारख्या महामारीत नागरिक जिवाच्या भीतीने घरात बसायचे त्या काळी हातावर पोट असलेले नागरिक काम बंद असल्याने जगायचे कसे या विवंचनेत असताना त्यांना मदतीचा हात म्हणून दिपक पाटील यांनी पुढाकार घेत त्यांना त्यांच्या झोपडीवर जावून, पालात जावून, रस्त्यालगत असलेले दीन नागरिकांना कुठलाही गाजावाजा न करता अन्नदान, धान्यदान तसेच मास्क, सँनीटाईजर देवून त्यांना मदत पुरवली. तसेच खा. चिखलीकर यांचा वाढदिवस असो किंवा महापुरुषांच्या जयंती उत्सव सोहळा असो त्या त्या वेळी अंध विद्यालय, अपंग विद्यालय, अनाथ मुलांचे वसतिगृह तसेच इतर विद्यालयात खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप केले. वृक्ष लागवड सह वृक्ष संवर्धन उपक्रमात त्यांनी केलेल्या बहुमोल कार्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषद हायस्कूल लोहाच्या वतीने यथोचित सन्मान करून त्यांचा गौरव केला. गोरगरीब नागरिकांच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसाहाय्य करणे अदी विविध कामे दीपक पाटील सातत्याने करत असल्यामुळे आपसूकच त्यांच्या सभोवती असंख्य तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आजघडीला उभी ठाकली आहे. त्यांच्या विविध समाजपयोगी कार्यांची लोह्यातील तरुणाईला चांगलीच भुरळ पडली असून दिवसागणिक त्यांचे चाहते वाढत असल्याने अगामी लोहा पालिका निवडणुकीसाठी त्यांना सर्वसामान्य मतदार पालिकेत पाठवितील असे शहर वाशियातून बोलले जात आहे.

Previous articleशिवराज्याभिषेक सोहळ्या प्रसंगी ठेवण्यात आलेले नाटक तात्काळ रद्द करावे
Next articleकोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासिका कादंबरी बलकवडे यांची बदली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here