Home पुणे भरत वाल्हेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाट्न

भरत वाल्हेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाट्न

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20230613-WA0006.jpg

भरत वाल्हेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाट्न
पिंपरी, ब्युरो चीफ उमेश पाटील :
नुकताच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या भरत वाल्हेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वाल्हेकरवाडी येथे करण्यात आले.
यावेळी सोनल पटेल, माजी आमदार मोहन जोशी, पृथ्वीराज साठे, शहराध्यक्ष कैलास कदम, भरत वाल्हेकर, माजी महापौर कविचंद भाट, श्यामलाताई सोनवणे, निगारताई बारस्कर, अशोक मोरे, अभिमन्यू दहितुले, संग्राम तावडे, नरेंद्र बनसोडे, सायली नडे, विश्वास गजरमल, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, बाबु नायर, उमेश खंदार, माउली मलशेट्टी, कौस्तुभ नवले, विजय ओव्हाळ, भीकू खेनट, माधवराव मोहिते, इकबाल शेख उपस्थित होते.
काँग्रेसने कर्नाटकमध्ये मिळविलेल्या विजयामुळे प्रेरित होऊन भाजपच्या भरत शंकरराव वाल्हेकर यांनी हॉटेल रागा येथे शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, की काँग्रेसला मोठी परंपरा आहे. अगदी संतांचे विचार हेच काँग्रेसचे विचार आहेत. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठी झेप घ्यायची आहे. काही महिन्यातच लोकसभा निवडणुका येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवर बसविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. त्यासाठी विविध सेलच्या माध्यमातून एकत्र येऊन नागरिकांमध्ये काँग्रेसची विचारधारा घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.
कैलास कदम म्हणाले, की इंटकच्या माध्यमातून मोठे जाळे निर्माण झाले आहे. शहर काँग्रेसमध्ये पूर्वीचे दिवस आणण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक निकालाने काँग्रेसमध्ये ऊर्जा निर्माण झाली असून, येत्या काही महिन्यात विविध पक्षातील चेहरे काँग्रेसमध्ये दिसतील. काँग्रेस मोठी भरारी घेईल, असा विश्वास आहे.
भरत वाल्हेकर म्हणाले, की काँग्रेस हा सर्व विचारधारांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत शहर काँग्रेस विविध मुद्दे घेऊन मतदारांपुढे जाईल. काँग्रेस नेतृत्वाने विश्वास दाखविल्यानेच काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. हा विश्वास सार्थ ठरविणार आहे.

Previous articleस्त्री ही अविरत कार्य करणारा कुटुंबाचा सशक्त आधार-
Next articleवारी सोहळा — माऊलींचा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here