Home नाशिक निफाडला समर्थ महिला शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ

निफाडला समर्थ महिला शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ

127
0

आशाताई बच्छाव

IMG-20230926-WA0067.jpg

निफाडला समर्थ महिला शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

समर्थ महिला शिक्षक सह पत संस्थेच्या वतीने निफाड येथील हॉटेल रुद्राय येथे संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न झाला. विद्यार्थी गुणगौरव समारंभात जिल्हा परिषद मा अध्यक्ष तथा क्रांतिवीर व्ही एन नाईक शिक्षण संस्था अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांचे हस्ते झाला.विद्यार्थ्याना संस्थेच्या वतीने मानपत्र व बक्षीस देणेत आले .याप्रसंगी बोलताना थोरे म्हणाले की, समर्थ महिला शिक्षक सह पत संस्थेचे कार्य गौरवास्पद असून अल्पावधीत स्व मालकीची इमारत घेऊन ,सभासदांना स्व भांडवल व ठेवींचे आधारे वेळेत कर्जपुरवठा करून १३%लाभांश दिला आहे व सभासद पाल्यांचा गुणगौरव करून कौतूकास्पद कामगिरी केली आहे,शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करून देशाची भावी पिढी घडवितात,समाजात शिक्षकांचे आदराचे स्थान आहे, जिल्हा परिषद शाळेत शिक्षक गुणवत्तापूर्ण व मूल्याधारीत शिक्षण ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण पद्धती राबवत असल्याने स्पर्धेच्या युगात विद्यार्थी पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळेत वाढत आहे शिक्षकांनी देखील स्पर्धेच्या युगात सामोरे जाताना दर्जेदार गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध व्हावे असे आवाहन केले,शिक्षक,विद्यार्थ्यांचे हितासाठी मी सदैव बरोबर असल्याचे याप्रसंगी थोरे यांनी सांगितले.
समर्थ महिला शिक्षक सह पत संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणेत आला,याप्रसंगी समर्थ महिला शिक्षक सह पत संस्थेच्या चेअरमन सौ मनिषा पांडुरंग कर्डीले,व्हा चेअरमन सौ सुनिता खंडू किट्टे कार्यवाह सौ सुशिला विजय सोनवणे व संचालक मंडळाचा उत्कृष्ट कार्याबद्दल थोरे यांचे हस्ते सत्कार करणेत आला, संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डीले,शिक्षक समितीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रकाश अहिरे,राज्य कार्यकारिणी सदस्य रविंद्र चव्हाणके,समितीचे निफाड तालुका कार्याध्यक्ष नवनाथ सुडके यांचा उत्कृष्ट संचलन व वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रपती विजेते शिक्षक सुरेश धारराव यांचा देखील वाढदिवसानिमित्त व शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल निफाड नं २चे उपशिक्षक विजय शिंदे,नैताळे शाळेचे उपशिक्षक नंदकिशोर घोडकर यांचा जि प माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश अहिरे म्हणाले की समर्थ शिक्षक पत संस्थेचे कार्य गौरवास्पद आहे,शिक्षकांचे प्रश्न समायोजन,बदली,चटोपाध्याय, निवड श्रेणी,मेडीकल बिले,बि एल ओ,सर्वेक्षण आदी व अशैक्षणिक कामे आदी प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक समिती नेहमीच कटिबद्ध आहे ,याप्रसंगी पांडुरंग कर्डीले,सौ विद्या पाटील पवार,सौ तिलोत्तमा पगार यांचे भाषणे झाली,याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे मा राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डीले,राज्य कार्यकारिणी सदस्य रविंद्र चव्हाणके, राज्य प्रतिनिधी अनंत गोसावी, समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश अहिरे,दत्तू सानप,श्रीकांत देवरे महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ विद्या पाटील पवार, सौंदाने पत संस्थेच्या संचालक सौ तिलोत्तमा पगार, ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघटना तालुका अध्यक्ष संजय बैरागी तालुका नेतेअविनाशबागडे रमेश गांगुर्डे, शिक्षक समिती निफाड तालुका अध्यक्ष संजय गवळी,सरचिटणीस खंडु किट्टे कार्याध्यक्ष नवनाथ सुडके,संदीप गायकवाड, भगवान बर्डे,दिलीप कातकाड़े,शंकर सांगळे श्रीकांत देवरे,प्रवीण शिंदे विकास मुळे, नरेश्वर ठाकूर,दिपक सुरंजे,शिक्षक समिती निफाड तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ वैशाली गांगुर्डे ,सौ ज्ञानेश्वरी चव्हाणके,सौ स्मिता सुडके,सौ सरिता येवले,सौ रत्ना गायकवाड,सौ विजया नवसारे,सौ वैशाली देवरे,सौ अनिता दरेकर,सौ निर्मला शिंदे,सौ सिमा बैरागी,सौ सारिका डबे,सौ वंदना नाईकवाडे लिपिक सौ अर्चना सोनारे आदीसह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन नवनाथ सुडके यांनी केले आभार रविंद्र चव्हाणके यांनी मानले.

Previous articleबावनपैकी एकही “कुळ” नसलेला चंद्रशेखर बावनकुळे!
Next articleम वि प्र संचलित नांदुर्डी विद्यालयात मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here