• Home
  • नवीन वर्षात मिळणार नव्या रूपात ATM स्मार्ट रेशन कार्ड 

नवीन वर्षात मिळणार नव्या रूपात ATM स्मार्ट रेशन कार्ड 

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201220-WA0007.jpg

नवीन वर्षात मिळणार नव्या रूपात ATM स्मार्ट रेशन कार्ड
नवी दिल्ली : ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली : आता तुमचं रेशन कार्ड ATM सारख होणार आहे. एक नेशन एक रेशन कार्ड योजने अंतर्गत आता नव्या वर्षात नव्या रुपात ATM कार्ड दिसणार आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे.

केंद्र सरकारकडून जवळपास 84 कोटी नागरिकांना आता ATM कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे. त्याची सुरुवात बिहारमधून केली जाणारा आहे.

एक नेशन एक रेशन कार्ड योजनेचा फायदा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.

त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड आता देशातील कुठल्याही राज्यात चालणार आहे.

त्यामुळे नोकरीसाठी अन्य राज्यांत गेलेल्या नागरिकांना, विस्थापित झालेल्या मजुरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे…

anews Banner

Leave A Comment