• Home
  • रावळगाव कारखान्यासमोर आमरण उपोषणाचा इशारा

रावळगाव कारखान्यासमोर आमरण उपोषणाचा इशारा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201220-WA0018.jpg

रावळगाव कारखान्यासमोर आमरण उपोषणाचा इशारा रावळगाव,(गोकुळ दळवी प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-रावळगाव साखर कारखाना येथे किमान ३० ते ३५ वर्ष प्रामाणिकपणे नोकरी करुन सेवानिवृत्त झालेत परंतु सेवामुक्त होवुन आता ३ वर्ष पुर्ण होतील मात्र कंपनीने आजतागायत त्यांची ग्रँजूएटी व रजाबील अदा केले नाही, थकित देयके बाकी असलेले एकुण २६ कामगार ३ अधिकारी असे एकुण २९ लोक सातत्याने कंपनी व्यवस्थापनास विनवणी करीत आहेत परंतु कुठलाही सकारात्मक निर्णय कंपनीने घेतलेला नाही, मराठा महासंघ पदाधिकारी श्री विष्णू अहिरे यांची देखील ग्रजूएटी व रजाबील घेणे बाकी आहे, त्यांचे व इतर कामगार यांची थकित देयके देण्यात यावीत यासाठी मराठा महासंघ नासिक व दाभाडी यांच्या वतीने मराठा महासंघ नासिक शहर अध्यक्ष श्री चंद्रकांत बनकर जिल्हा उपाध्यक्ष श्री हरीदादा निकम व नासिक जिल्हा सरचिटणीस श्री अमोल निकम, यांच्या नेतृत्वात दि २३ नोव्हेंबर रोजी व दि ५ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते परंतू कंपनीने सदर निवेदन गम्भीरपणे घेतले नाही व उलट उडवा उडवीची उत्तरे देत कामगार वर्गाच्या मागणी व कायदेशीर हक्का कडे दुर्लक्ष केले आहे, ग्रजूएटी कायदा १९७२ प्रमाणे कामगार वा अधिकारी सेवानिवृत्त झालेवर त्यांची ग्रजूएटी २१ दिवसात देणे बंधनकारक असताना आज ३ वर्ष होवून देखील कामगार व अधिकारी याना ग्रजूएटी तसेच रजाबील अदा करण्यात आले नाही म्हणजेच कंपनीकडून कायदा उल्लंघन होते आहे या बाबत सर्व शासकीय अधिकारी याना निवेदन प्रती देण्यात आल्या आहेत, कामगार उपायुक्त यानी त्वरित याची चौकशी करने गरजेचे आहे, आम्ही मराठा महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनास कुठलाच प्रतिसाद व लेखी ऊत्तर कंपनीने दिलेले नाही म्हणुंन दि १०डिसेंबर रोजी मानव अधिकार दिवस निम्मीत साधुन विष्णू अहिरे तसेच थकित देयके बाकी असलेले कामगार दि २५ डिसेंबर २०२० रोजी कंपनी प्रवेशद्वारा समोर उपोषणास बसणार आहोत अश्या आशयाचे निवेदन कंपनीला देण्यात आले आहे व त्याच्या प्रती उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मालेगाव याना तसेच वडनेर खाकूर्ड़ि पोलिस स्टेशन याना देन्यात आल्या आहेत, निवेदन देतेवेळी मराठा महासंघ जिल्हा सरचिटणीस श्री अमोल निकम, युवा मराठा न्यूज़ चे मुख्य सम्पादक राजेंद्र पाटील, मराठा महासंघ रावळगाव शहर अध्यक्ष एकनाथ पगारे, उपाध्यक्ष राजू गिरी पवार पदाधिकारी, नितीन पाटील, संदीप खैरनार , भालचंद्र अहिरे,सोमनाथ बनकर,सुरेश पवार गजु पवार, निवृत्त कामगार अशोक बनकर, सुरेश कुलकर्णी, प्रकाश पाखले, शरद हिरे,कामगार यूनियन अध्यक्ष राजेंद्र मानकर, पदाधिकारी बलवंत कोठावदे , राजेंद्र देसले, अशोक गवळी, नानाजी जाधव, चंद्रकांत जाधव,तसेच जयवंत रौदळ कृष्णा सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते, अमोल दादा निकम, विष्णू अहिरे व माजी सैनिक अशोक बनकर यांची भाषणे झाली त्यात कंपनीने त्वरित निर्णय घ्यावा उपोषण दरम्यान कुणाच्या जीवीताचे काही कमी जास्त झाल्यास त्यास कंपनी जाबबदार राहिल व त्यानंतर आंदोलन आजुन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला, या उपोषनास मराठा महासंघ, प्रातिनिधिक कामगार यूनियन, अखिल मानव अधिकार संघटना, तसेच इतर संघटना देखील सामिल होतील तसेच रावळगाव व दाभाडी येथील पदाधिकारी ग्रामस्थ यांचा देखील पाठिंबा कायदेशीर रित्या असनार आहे तसेच मराठा महासंघ राष्ट्रीय सरचिटणीस श्री राजेंद्र कोंढरे, चिटणीस प्रमोदराव जाधव, राष्ट्रीय युवक अध्यक्ष अतिष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने पुढील दिशा ठरविली जाईल याची कंपनी व्यवस्थापनाने नोंद घ्यावी विशेष आणी खेदाची बाब म्हणजे ज्या ही वेळी आम्ही मराठा महासंघ पदाधिकारी व यूनियन पदाधिकारी निवेदन घेवुन प्रत्यक्ष चर्चेसाठी कारखाना स्थळी गेलो तेव्हा प्रत्येक वेळी सक्षम अधिकारी श्री देवन्द्र कुलकर्णी हे भेटले नाहीत जाणुन बुजुन बाहेर निघुन गेलेत म्हणजेच मालकानी संगनमत करुन कामगाराचा मानसिक छळ चालवला आहे हा हेतू स्पष्ट होतो, तरी आम्हीही याची गम्भीर दखल घेतली आहे यापुढे सक्षम अधिकारी यानी निर्णयाचे अधिकार घेवुन चर्चेसाठी समोर यावे आन्यथा नाईलाजाने आंदोलन दिशा तीव्र करावी लागेल व त्यावेळी होनारे परिणामास कंपनी जबाबदार राहिल तसेच उपोषण दरम्यान कुणाचे काही कमी जास्त झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातिल हे स्मरणात ठेवून योग्य निर्णय घ्यावा,

anews Banner

Leave A Comment