Home बुलढाणा समाज क्रांती आघाडीने गट विकास अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन केले सादर.

समाज क्रांती आघाडीने गट विकास अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन केले सादर.

30
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20231221_043609.jpg

समाज क्रांती आघाडीने गट विकास अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन केले सादर.

संग्रामपूर बिडिओ पायघन यांच्या कार्यालयात बातमी संकलन करिता आलेल्या पत्रकारास विरोध करत पाठवले बाहेर.

युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा
संग्रामपूर पंचायत समिती येथे आज दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी समाज क्रांती आघाडी कडून गट विकास अधिकारी यांना विविध समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून
पीएम आवास व रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत असाणारे घरकुलामध्ये गरिब “अधिक श्रीमंत ज्यांना सध्या स्थितीमध्ये घरकुलाची आवश्यकता असताना राजकीय हेतूने प्रेरीत होऊन राजकीय द्वेषा मूळे मागचे नंबर पुढे करून ग्रामपंचायतचे सरकार गरीब गरजू लोकांना वंचित ठेवून सर्वांसाठी एकच कायदा समानता असताना सर्व समान न्याय हक्क आणि अतिशय गरजू घरकुल लाभार्थ्यांना वंचित ठेवले असुन गरजु लाभार्थ्यांना वंचीत ठेवत आहेत. सर्वांसाठी एकच कायदा समानता असतांनाही गरजु लोकांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन बीडिओ पायघन यांच्या दालनात समाज क्रांती आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चर्चा सुद्धा केली परंतु लोकांची समाधानी झाली नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे समाज क्रांती आघाडी या संघटने च्या लोकांनी पत्रकार यांना सुद्धा त्यांच्या समस्यांचे निवारण होण्यास व बातमी संकलन करण्यासाठी नेले असता त्यांचा सुद्धा अवमान संग्रामपूर गट विकास अधिकारी माधव पायघन यांच्याकडून करण्यात आला या वेळी उपस्थित सर्व नागरिकांना बिडिओ यांच्याकडून पत्रकारास मिळालेल्या असभ्य वागणुकीमुळे धक्काच बसला असून, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकाराला जर हाकलून लावल्या जाते तर साधारण माणसासोबत काय होत असेल..? असा प्रश्न या ठिकाणी समाज क्रांती आघाडी व तालुक्यामधील जनतेला पडला आहे.
🔴संग्रामपूर पंचायत समितीला गटविकास अधिकारी माधव पायघन आले तेव्हापासून त्यांच्याकडून सामान्य नागरिकांना तसेच पंचायत समिती अंतर्गत चालू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत विचारणा करणाऱ्यास एकतर 353 सारखा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या बिडीओ कडून मिळतात. आणि तक्रारदाराच्या समस्येचे निराकरण न करता अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांच्या दालनातून तक्रार करत्यांना व पत्रकारांना सुद्धा हाकलून लावण्याचे प्रकार राजरोजपणे सुरू असल्याचे दिसून येतं आहे अशा हुकूमशाही पद्धतीने नागरिकांना वागणूक देणाऱ्या बिडिओ पायघण यांची कान उघडणी करून त्यांना जनते प्रती असणाऱ्या त्यांच्या कर्तव्याची शिकवण वरिष्ठांनी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here