Home सोलापूर राज्यात दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची...

राज्यात दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया सुरू

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20231221_044206.jpg

राज्यात दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया सुरू
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप

राज्यात दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली. शासनाच्या महसूल व कृषी यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करीत विसाव्या दिवशीच पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई डीबीटी प्रणालीनुसार अदा करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, आमदार योगेश कदम, मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here