Home गडचिरोली गडचिरोली भामरागड आदिवासी माडीया मोहत्सवातुन माडीयाच गायब आदिवासी विकास निधी खर्चाच्या नवनवीन...

गडचिरोली भामरागड आदिवासी माडीया मोहत्सवातुन माडीयाच गायब आदिवासी विकास निधी खर्चाच्या नवनवीन पध्दतीने आदिवासींनाच भोवळ येण्याची पाळी

51
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220604-WA0012.jpg

गडचिरोली भामरागड आदिवासी माडीया मोहत्सवातुन माडीयाच गायब
आदिवासी विकास निधी खर्चाच्या नवनवीन पध्दतीने आदिवासींनाच भोवळ येण्याची पाळी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली हा आदिवासी बहुल जिल्हा त्यातल्या त्यात भामरागड 80% च्या वर माडीया आदिवासी असनारा तालुका ऐके काडी मा.राज्यपाल या तालुक्याला दत्तक घेतले होते.व आदिवासींच्या व्ययक्तिक गर्जा करीता 2 कोटि दिले.यातुन प्रशासनाने पावसाळ्यात अन्नधान्य,घरावर कवेलु,अश्यावर हा 2 कोटि निधी खर्च करण्याचे मा.राज्यपाल जे आदिवासींच्या विकासाचे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत त्यानी सुचना दिल्या होत्या.पण गडचिरोली प्रशासनाने या 2 कोटी तुन भामरागड तालुका तहसील ऑफीस बांधुन टाकले व उरलेला निधी त्याना ज्याच्यात ईन्ट्रेस्ट तिथे खर्च केला.व मा.राज्यपाल याना आपल्या सुचने प्रमाणे खर्च केल्याचे पाठवुन दिले.विचार करा गडचिरोली जिल्ह्यात खासदार,3 आमदार आदिवासी आहेत हे प्रशासनाचा भारत सरकारच्या दिशा समीती व राज्यी सरकारच्या डीपीटिसी च्या माध्यमातून आढावा घेतात तरीपण हि स्थीती आहे म्हनुन स्वतंत्र्यच्या 70 वर्षात ऐका आदिवासी व्यक्ती वर अंदाजे 60 ते 70 लाख खर्च झाल्याच्या नोंदिचा सविस्तर समाचार घेतल्यास ऐवड्या निधीच्या व्याजावर आदिवासी क्लास-1 चे जीवन जगला असता.”””डाॅ बाबासाहेब म्हणाले होते संविधान चांगले असुन चालत नाहि अमलबजावणी करनारे प्रामाणिक असावे लागतात
नुकतेच मे च्या अखेरच्या आठवड्यात भामरागड येथे “आदिवासी माडीया मोहत्सव”भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून घेण्यात आला प्रसिध्दी भरपुर केली त्या मुळे मिडीया,पत्रकार पण ब-या संख्येने उपस्थित होते.या मोहत्सवाच्या माध्यमातून आदिवासी माडीया समाजाची सांस्कृतिक बाजु पुढारलेल्या समाजा पुढे येणे,जैवविविधतचे 80% जतन हा समाज करतो,आदिवासी जिथे जिथे म्हणून आहेत तिथे नदि-नाले साफ सुतरे आहेत. जंगल भरपुर प्रमाणात आहे.आदिवासी हुंडा घेत नाहि उलट लग्न सोहळ्यात मुली वधु ला आर्थिक,अन्नधान्याचे,सहकार्याचीमदत करतात.आदिवासी आहेत तिथे भ्रुण हत्या होत नाहि पुरूषा पेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. मात्रुसत्ताक पध्दती आहे.स्री पुरुष समाण अधिकार.आदिवासी आत्मनिर्भर आहेत.या भामरागड भागात सरकार नाल्यावर पुल बांधुन देण्याची आदिवासी वाट बघत नाहि.तर बांबू च्या काम्बिचा पुल तयार करतात या सर्व बाबी महाराष्ट्रा पुढे येणे अपेक्षित होते
पण नेमक उलट झाल या आदिवासी माडीया मोहत्सवा पासुन माडीया आदिवासीनाच दूर ठेवल,शिळे अन्न चारुन या आदिवासी युवकांची ऐक प्रकारे थट्टा केली.उपराजधानीतील कार्यक्रम व्यवस्थापण करना-या कंपणीला आपल्या मर्जीने आयोजनाची धुरा दिली त्यानी शिळे अन्न देउन आदिवासी ची च बोडवन केली.ते पुढे पण करनार आहेत ते पुर्वि पण केले आहे.स्थानिकाना या मोहत्सवात सहभागी करण्यात आले नाहि.109 गावांची भामरागड पट्टि पारंपरिक इलाका समिती आहे.हि समिती आदिवासी माडीया संस्कृतीच्या प्रचाराचे काम करते.पण या समितीला महोत्सवात स्थान नव्हते.या भागात पेसा ग्रामपंचायती आहेत त्याना हि सहभागी करुन घेतले नाहि.महोत्सवात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या परीसरातुन बहुसंख्येने मुली उपस्थित होत्या पण या सर्व आदिवासी मुलीन करीता स्वच्छताग्रुह व ईतर व्यवस्था नव्हती.आदिवासी मुले,मुली उपाशी राहिली.ज्यांचा पैसा ते उपाशी व जे नौकर ते मात्र तुपाशी
रामायण,महाभारत,महारानाप्रथाप,छत्रपती शिवाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई,या काळा पासुन तर 1947 च्या स्वतंत्र्या काळा पर्यंत भारत देशा करीता अमुल्य असे योगदान देनारा जनजाती/आदिवासी समाज या समाजा बाबत देशाला गर्व असायला पाहिजे पण ईथे तर आदिवासी निधि कसा व कोणत्या पध्दतीने घश्यात घालता ऐईल याचीच नवनवीन पध्दती शोधली जात आहे.व जिथे जास्त प्रोव्हिजन तो कार्यक्रम घ्यायचा मात्र त्याला नाव काय तर “””आदिवासी माडीया मोहत्सव”””
प्रकाश गेडाम
प्रदेश सरचिटणीस संघटन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here