Home गडचिरोली धक्कादायक!    जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोघांना जिवंत जाळणाऱ्या 15 आरोपींना गडचिरोली पोलिसांनी...

धक्कादायक!    जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोघांना जिवंत जाळणाऱ्या 15 आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केले अटक

104

आशाताई बच्छाव

1000341856.jpg

धक्कादायक!    जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोघांना जिवंत जाळणाऱ्या 15 आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केले अटक

सर्व 15 आरोपींना 05 पोलीस कोठडी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): 01 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बरसेवाडा गावामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन वैक्तिची गावकऱ्यांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की,दि 02/05/2024 रोजी पोस्ट एटापल्ली येथे दिलेल्या फिर्यादी नूसार दिं 01-05-2024 रोजी एटापल्ली तालुक्यातील मौजा बरसेवाडा येथील नामे 1) जमनी देवाची तेलामी वय 52 वर्ष व 2) देवू कटलीया अतलामी वय 57 वर्ष या दोघांना गावातील काही इसम एकत्र येऊन गावात पंचायत बोलावून हे दोघे जादूटोणा करतात कु. आरोही बंडू तेलामी वय 35 वर्ष रा. बरसेवाडा हिचा मृत्यू जादूटोणा केल्यामुळे झाला असा आरोप या दोघांन वरती करुन यांना अत्यंत निर्घूण पणे मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. मृतक जमनी देवाची तेलामी हिचा भाऊ सादू मासा मूहोंदा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एटापल्ली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

या घटनेची समाजातील सर्व स्तरातून खेद व्यक्त करून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरिता मागणी करण्यात आली. घटनेची गार्भिय व तीव्रता लक्षात घेऊन श्री नीलकंठ कुकडे प्रभारी अधिकारी पोस्टे एटापल्ली यांनी तपास पथकासह सदरच्या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्या बाबत निर्देशित केल्याने वरील अधिकारी व सहकारी अधिकारी यांनी अमलदारासह बरसेवाडा येथे जावून घडलेल्या घटनेची घटनास्थळ पाहणी करुन सखौल चौकशी अंती 15 आरोपींना अटक करण्यात आले.या मध्ये 1) अजय बापू तेलामी, 2)भाऊजी शञू तेलामी,3) अमित समा मडावि,4) मिरवा तेलामी,5)बापू कंदरु तेलामी,6) सोमजी कंदरु तेलामी, 7) दिनेश कोलू तेलामी 8) बिरजा तेलामी 9) मधुकर देऊ पोई 10) नागेश रामजी तेलामी 11) गणेश बाजू हेडो 12) मधुकर शञू तेलामी 13)देवाजि मूहोंदा तेलामी 14)दिवाकर देवाजी तेलामी 15 )बिरजा तेलामी सव रा. बारसेवाडा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांना पोस्टे एटापल्ली अप क्र. 24/2024 मधिल कलम 302, 307, 201,143, 147, 149, भादवी, सहकलम 3 (2) महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानूष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अन्वये दाखल गून्हात अटक करण्यात आली. सर्व आरोपिना मा. प्रथम न्यायालय अहेरी येथे हजर केले असता सर्व आरोपींना 05 दिवसाची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली.

सदर कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पम सा.मा अप्पर पोलीस अधीक्षक ( प्रशासन)श्री.कुमार चिंता सा.मा.अपर पोलिस अधीक्षक ( अभियान) श्री यतिश देशमुख सा.मा.अप्पर पोलिस अधीक्षक, अहेरी श्री एम. रमेसा सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री चैतन्य कदम सा यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक श्री नीलकंठ कुकडे प्रभारी अधिकारी पोस्टे एटापल्ली ,सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे , नागरगोजे, म्हेञे , गिरवलकर, व इतर सर्व अमलदार यांनी मेहनत घेऊन गुन्हा उघडकिस आनला.

Previous articleपुढचा दीड महिना जलसंधारणाच्या कामांची मोहीम राबवा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Next articleकौटुंबिक शुल्लक वादातून खडकाडीपुरा अमरावती येथे तरुणाची हत्या: आरोपी फरार; हत्यारी नातेवाईकच.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.