आशाताई बच्छाव
कौटुंबिक शुल्लक वादातून खडकाडीपुरा अमरावती येथे तरुणाची हत्या: आरोपी फरार; हत्यारी नातेवाईकच.
_______
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय प्रतिनिधी.
अमरावती
शुल्लकारणावरून उद्भवलेल्या कौटुंबिक वादात एका तरुणाची चाकूने हल्ला चढवून हत्या करण्यात आली. ही घटना आज गुरुवारी दोन मे रोजी कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत खडकाडीपुरा येथे घडली. मारेकरी पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. प्रतीक प्रवीण जोशी वय २८रा.खरकाडीपुरा अमरावती असे मृतका चे नाव असून सुमित जोशी वय २६रा.खरकाडीपुराअमरावती असे पसार झालेल्या मारेकार्यांचे नाव आहे. प्रतीक जोशी व सुमित जोशी हे दोघे नातेवाईक असून गुरुवारी सायंकाळी त्यांच्यात कुठल्यातरी शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादा त सुमित जोशी ने प्रतीक वर चाकुहल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला प्रतीक जोशी हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर सुमित जोशीने तेथून पळ काढला. दरम्यान, नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी प्रतीक जोशीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णाला दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यानच्या काळात खोल्हापुरी गेट अमरावती पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलीस पसार झालेला आरोपी सुमित जोशीचा कसून शोध घेत आहे.






