Home नांदेड मुखेड तालुक्यातील बिहारीपुर भाटापूर येथील पवनपुत्र गणेश मंडळाच्यावतीने नेत्ररोग तपासणी शिबिरांचे आयोजन.

मुखेड तालुक्यातील बिहारीपुर भाटापूर येथील पवनपुत्र गणेश मंडळाच्यावतीने नेत्ररोग तपासणी शिबिरांचे आयोजन.

109
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील बिहारीपुर भाटापूर येथील पवनपुत्र गणेश मंडळाच्यावतीने नेत्ररोग तपासणी शिबिरांचे आयोजन.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील बिहारीपुर(भाटापूर) गणेश मंडळाकडून स्तुत मोफत नेत्ररोग शिबीर आयोजित करण्यात आले .परीसरातील तसेच गावातील गरजू ( १५६) गोर गरीब नागरिकांनी नेञरोग शिबीरचा लाभ घेतला. गणेशोत्सवामधील युवा शक्तीच्या माध्यमातून गरीब-गरजू लोकांना मदत पवनपुत्र गणेश मित्र-मंडळ बिहारीपुर(भाटापूर) तर्फे मोफत नेत्रदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस उपनिरीक्षक कागणे साहेब,कार्यक्रमाचे अध्यक्ष हाणमंतराव पाटील,प्रमुख पाहुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर संदीप पाटील,अनिल पाटील,प्रदीप पाटील,मनोज बनबरे,खंडेराव वडजे,राम पाटील,
गणेश मंडळाचे अध्यक्ष सोपान महाराज भाटापुरे,उपाध्यक्ष विष्णू पाटील जाधव,संभाजी पाटील,हरिदास पाटील,विष्णुकांत पाटील,बजरंग जाधव,अमोल पाटील,संग्राम बिरादार,हरिदास गाडेराव,पांडुरंग गाडेराव,गणेश होकने,पिंटू पाटील,मदन पाटील,शुभम पाटील,अनिल वाघमारे,बाळासाहेब सूर्यवंशी,संजय अडगुलवार,बालाजी सूर्यवंशी,नामदेव जाधव यांच्यासह गावकऱ्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मोफत नेञ तपासणी डॉ.ज्योति सूर्यवंशी, डॉ.सोमू मंडळे, डॉ.सोमोशी मॅडम यांनी केली आहे. पवन पुत्र गणेश मंडळाकडून राबविण्यात आलेल्या नेत्ररोग शिबिरांचा गरजू रुग्णांनी लाभ घेतला. स्तुतीपूर्ण उपक्रमाची चर्चा परिसरातून ऐकावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here