Home पश्चिम महाराष्ट्र जलतज्न राजेंद्रसिंह राणा यांची नांगोळे येथे भेट!

जलतज्न राजेंद्रसिंह राणा यांची नांगोळे येथे भेट!

142
0

राजेंद्र पाटील राऊत

सांगली,(शरद चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-     भारताचे ‘जलपुरुष’ म्हणून ख्याती असलेले, रॅमन मॅगसेसे पुरस्काराप्राप्त जगप्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह राणा साहेब यांनी आज सकाळी नांगोळे, ता. कवठेमहांकाळ, जि.- सांगली येथील मियावाकी घनवन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पातील झाडांची जैवविविधता, त्यांची जलद वाढ, त्यात झालेली पक्ष्यांची घरटी इत्यादी पाहून डॉक्टरांना खूप आनंद झाला. त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेऊन काही महत्वाच्या सूचनाही दिल्या. हा प्रकल्प जलबिरादरी आणि नेचर काँजरवेशन सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला आहे. हा डोंगरउतारावर केलेला भारतातील तिसरा मियावाकी प्रकल्प आहे. या प्रसंगी जलबिरदारीचे महाराष्ट्र प्रभारी श्री. नरेंद्र चुघ, जिल्हा उपवनसंरक्षक श्री. विजय माने साहेब, कवठेमहांकाळचे तहसीलदार श्री. गोरे साहेब, जलसाक्षरता अभियानाचे प्रशिक्षक श्री. रमाकांत कुलकर्णी, विकिपीडिया स्थानिक भाषा तज्ज्ञ श्री. उपेंद्र कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleई – पिक पाहणी संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन
Next articleमुखेड तालुक्यातील बिहारीपुर भाटापूर येथील पवनपुत्र गणेश मंडळाच्यावतीने नेत्ररोग तपासणी शिबिरांचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here