Home विदर्भ श्री क्षेत्र झुंज दुर्घटना प्रकरणी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना राज्य...

श्री क्षेत्र झुंज दुर्घटना प्रकरणी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी

90
0

राजेंद्र पाटील राऊत

श्री क्षेत्र झुंज दुर्घटना प्रकरणी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू
दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अमरावती वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन केली.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वर्धा नदीत बुडून उलटून झालेल्या दुर्घटनेत 14 सप्टेंबर रोजी अकरा व्यक्ती नदीमध्ये बुडाल्या. त्यापैकी तीन व्यक्तींचे मृतदेह शोध बचाव पथकाने शोधून काढले असून उर्वरित व्यक्तींचा आपत्ती निवारण दल व जिल्हा पथकाद्वारे शोध घेणे चालू आहे. सदर घटनेमुळे संबंधितांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुःखद प्रसंगी आपण सर्व त्यांच्या समवेत उभे आहोतच तरी या घटनेतील व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या, तसेच सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी तात्काळ मदत मिळावी, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

महाविकास आघाडी शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितपणे मदत मिळवून दिली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत आपद्ग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत मिळण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

Previous articleमुखेड तालुक्यातील बिहारीपुर भाटापूर येथील पवनपुत्र गणेश मंडळाच्यावतीने नेत्ररोग तपासणी शिबिरांचे आयोजन.
Next articleअतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचे आवाहन गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमिवर अधिक खबरदारी आवश्यक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here