• Home
  • *कौळाणे- व-हाणे पत्रकार भवन जागा प्रश्नी अक्षम्य निष्काळजीपणा*

*कौळाणे- व-हाणे पत्रकार भवन जागा प्रश्नी अक्षम्य निष्काळजीपणा*

  1. *कौळाणे- व-हाणे पत्रकार भवन जागा प्रश्नी अक्षम्य निष्काळजीपणा* *चौकशी अधिकाऱ्यांना काढली कारणे दाखवा नोटीस*
    मालेगांव( ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या कौळाणे (निं) व व-हाणे गावातील पत्रकार भवनच्या जागा मागणीसंदर्भात तेथील ग्रामसेवकांनी अडवणुक करुन फसवणूक केल्याच्या निषेधार्थ दिनांक १२ आँक्टोबर २०२० रोजी युवा मराठा न्युजच्या वतीने मालेगांव पंचायत समितीसमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आलेला होता.त्याची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी याप्रकरणी चौकशी करुन तात्काळ चौकशी अहवाल देण्याचे लेखी पत्र युवा मराठा न्युजला दिलेले होते.तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून गुलाब बी राजबन्शी यांची निवड पंचायत समितीकडून करण्यात आलेली असताना,तात्काळ चौकशी अहवाल उपलब्ध करुन देण्याची हमी देणाऱ्या गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्याच कर्मचाऱ्यांने पुरता महिना लोटला गेला तरी अहवाल उपलब्ध करुन दिला नाही,किंवा योग्य पध्दतीने सदरील कौळाणे (निं.) आणि व-हाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे व ग्रामसेवक संजीव घोंगडे यांची चौकशी केलेली नाही,म्हणून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत चौकशी अधिकारी गुलाब राजबन्शी यांना काल गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून या प्रकरणात सात दिवसात चौकशी करुन अहवाल उपलब्ध करुन द्यावा असे म्हटले आहे.आता या प्रकरणाला नेमका काय रंग मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
anews Banner

Leave A Comment