Home गडचिरोली टिसीओसी च्या कालावधिच्या प्राश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगीरी।

टिसीओसी च्या कालावधिच्या प्राश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगीरी।

100
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220526-WA0002.jpg

टिसीओसी च्या कालावधिच्या प्राश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगीरी।

12 लाख रुपये ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): शासनाने जाहीर केलेले आत्मसमर्पण योजना,वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जिवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांनसह अनेक जहाल माओवाद्यांनी आज पर्यत आत्मसमर्पण केले आहे.त्याच बरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवुन आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.नुकतेच 12 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादि नामे रामसिंग उर्फ सिताराम बक्का आञाम,वय 63 वर्ष रा. अकापल्ली ता. अहेरी जि.गडचिरोली व माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी वय 34 वर्ष रा. गट्टेपल्ली, पोमके हाल्लेवारा ता.एटापल्ली जि.गडचिरोली या दोन जहाल नक्षलवाद्यांनी मा.पोलिस अधिक्षक श्री अंकित गोयल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले.आत्मसमर्पित सदस्याबाबत माहीती नामे रामसिंग उर्फ सिताराम बक्का आञाम

!!दलममधिल कार्यकाळ!!

1) माहे मार्च 2005 ला अहेरी दलम मध्ये सदस्य पदावर भरती हऊन कार्यरत व 03 महिणे पेरमिली मध्ये कार्यरत होता.

2) माहे 2005 पासुन तो माड डिव्हिजन टेक्नीकल दलमध्ये कार्यरत होता.

3) माहे सन 2007 ते सन 2012 पर्यत उप-कमांडर पदावर कार्यंरत होता.

4) सन 2012 ते मार्च 2022 पर्यंत भामरागड एरिया टेक्नीकल दल मध्ये एसीएम पदावर पर्यंत कार्यरत होता.

कार्यकाळात केलेले मोठ्ये गुन्हे

1) रामसिंग यांच्यावर 01 खुन,01 चकमक व इतर 01 असे एकुण 03 गुन्हे दाखल आहेत.

1) मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही,हिकेर,आशा- नैनगुंडा,आलदंडी ,चकमकित तो सहभागी होता.

आत्मसमर्पित होण्याची कारणे

1) शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांनमुळे जनतेचा नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळत नाही.

2) वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्व:ताच्या फायद्यासाठी गरीब युवक – युवतीचा वापर करुन घेतात

3) दलमध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंञ आयुष्य जगता येत नाही

4) पोलिस दलाच्या सततच्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे.

5) वरिष्ठ कँडरचे माओवादी सर्व जमा केलेला पैसा स्व:ताच्या उन्नतीसाठी वापरतात व कनिष्ठ माओवाद्यांना गरजेपुरताही पैसा दिला जात नाही.

6) खबरी असल्याच्या फक्त संशयावरुन आमच्या बांधवांना ठार मारायला सागतात

7) नक्षल दलममध्ये अहोराञ भटकंतीचे जीवन असुन सुध्दा स्व:ताच्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिला जात नाही.

नामे माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी दलममधील कार्यकाळ

1)माहे नोव्हेंबर 2002 ला कसनसुन दलममध्ये सदस्य पदावर भरती हऊन ती माहे डिंसेबर 2012 पर्यत कार्यरत होती.
2) माहे डिंसेबर 2012 ते सन 2013 पर्यत भामरागड दलममध्ये कार्यरत होती.
3) माहे फ्रेब्रुवारी 2013 ते माहे एप्रिल 2022 पर्यंत पेरमीली दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती.

कार्यकाळ केलेले गुन्हे

1) माधुरी हिचेवर 04 खुन, 21 चकमक, 07 जाळपोळ, व इतर 05 असे एकुण 37 गुन्हे दाखल होते.
2) मौजा वेळमागड, कसनसुर व माडवेली चकमकिमध्ये सहभागी होती.

आत्मसमर्पित होण्याची कारणे

1) महिला नक्षलीनां वैद्यकिय कारणाकरीता पैसे दिले जात नाही.
2) नक्षल दलममध्ये वरिष्ठ माओवाद्यांकडुन स्ञी आणी पुरुष यांच्यामध्ये भेदभाव केला जातो.
3) महिला नक्षलवाद्यांना वरच्या पदा पर्यंत जाण्याची संधी मिळत नाही.
4) महिला नक्षलवाद्यांना फक्त अवजड कामे दिली जातात.व त्यांना महत्वाच्या अभीयानात सहभागी केला जात नाही.
5) वरिष्ठ माओवाद्यांकडून महिला नक्षलींना लग्नासाठी बडजबरी केली जातात.
6) पोलिस- नक्षल चकमकी दरम्यान महिला नक्षलींना समोर करुन पुरुष नक्षलवादी हे पळुन जातात.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले बक्षीस

1) महाराष्ट्र रामसिंग उर्फ सिताराम आञाम याचेवर 06 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
2) माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन मट्टामी हिचेवर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडुन मिळालेले बक्षीस

3) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रामसिंग उर्फ सीताराम आञाम यास एकुण 4.5 बक्षीस जाहिर केले आहे.
4) आत्मसमर्पणा नंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन माधुरी उर्फ सुमन मट्टामी हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले.

गडचिरोली पोलिस दलाने अतीशय प्रभावित पण नक्षल विरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने सनन्माणाने जीवन जगण्यासाठी सन 2019 ते 2022 साल मध्ये आतापर्यत एकुण 49 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.विकास कामाना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांनवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहितील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री अंकित गोयल यांनी केले आहे.

Previous articleपुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ‘चाचा’ला मरेपर्यंत जन्मठेप
Next articleमुखेड शहरात चोरट्याने घातली धुमाकूळ ! चोरट्याने तीन ठिकाणी दुकाने फोडली !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here