Home पुणे पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ‘चाचा’ला मरेपर्यंत जन्मठेप

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ‘चाचा’ला मरेपर्यंत जन्मठेप

63
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220525-WA0033.jpg

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ‘चाचा’ला मरेपर्यंत जन्मठेप
पुणे ,(उमेश पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क)– अल्पवयीन तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी सुनावली.

तो आरोपी पीडितेच्या ओळखीचा होता. ती त्याला चाचा म्हणायची. या विश्‍वासाला तडा घालवून त्याने तिच्यावर अत्याचार केला आहे. त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला आहे. छबी मोहन सोनी (वय 25, रा. किरकटवाडी, मूळ. उत्तरप्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत किरकटवाडी येथे हा प्रकार घडला. याबाबत पीडितेच्या आईने हवेली पोलिसात फिर्याद दिली आहे. विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी या प्रकरणात आठ साक्षीदार तपासले. पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस फौजदार विद्याधर निचित यांनी काम पाहिले. तर न्यायालयीन कामासाठी हवालदार सचिन अडसुळ आणि नाईक किरण बरकाले यांनी मदत केली.

पीडित आठ वर्षांपूर्वी खानावळीचा डबा देत असल्याने सोनी तिच्या ओळखीचा होता. जास्तच ओळख निर्माण झाल्यानंतर पीडित, तिची आई, भाऊ आणि सोनी एकाच खोलीत राहत होते. रेशन, घरफाडे भरण्यास तो मदत करत असत. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने पीडितेवर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास आईला मारून टाकण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे याबाबत पीडितेने कोणाला सांगितले नाही.
पीडित गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

Previous articleअहेरी-वांगेपल्ली मधील ले आऊटधारकांकडून नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची चौकशी करा..!!
Next articleटिसीओसी च्या कालावधिच्या प्राश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगीरी।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here