Home बुलढाणा नावाजलेला गुरांचा बाजार भरणाऱ्या वरवट बकाल येथील ठिकाणची दिशा बद्दलविण्याचे निर्देश

नावाजलेला गुरांचा बाजार भरणाऱ्या वरवट बकाल येथील ठिकाणची दिशा बद्दलविण्याचे निर्देश

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20220619-WA0007.jpg

नावाजलेला गुरांचा बाजार भरणाऱ्या वरवट बकाल येथील ठिकाणची दिशा बद्दलविण्याचे निर्देश
(रविंद्र शिरस्कार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
वरवट बकाल येथे उत्साहाने भरणारा,गुरांचा फार मोठया प्रमाणात उलाढाल होणारा बाजार यापुढें संग्रामपूर येथे भरवण्यात येणार आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर यांच्या कडून प्राप्त झाली असून यांचे अंडर मधील वरवट बकाल येथील शनिवारी बैलांचा बाजार भरवण्यात येत असतो परंतु पावसामुळे बाजारात खूप प्रमाणात पाणी थांबते व चिखल होतो,म्हणुन आणि वर्षी पावसाळ्यामध्ये बकऱ्या, गाई, म्हशी, बैल या सर्व जनावरांना व लोकांना त्रास सहन करावा लागला यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर यांच्या विद्यमाने हा बाजार वरवट ऐवजी संग्रामपूर येथे भरवण्याची तयारी करीत आहेत परंतु वरवट या गावातील तसेच या बाजारात येणारे हजारो लोकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. कारण वरवट बकाल येथील गुरांचा बाजार हा अनेक वर्षापासून भरत आहे, वरवट बकाल हे मध्यवर्ती ठिकाण असुन आजूबाच्या लोकांना जवळ पडते त्याचप्रमाणे या बाजारात झालेल्या उलाढालीवर प्रत्येक हफ्त्याला लोकांची,व्यापाऱ्यांची वसुली पण होत असते बाजार हा येथेच भरावा अशी लोकांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे याच बाजारातील जागेवर भरती किंवा सिमेंट काँग्रेटचे काम करून, या बाजाराच्या आवाराला बांधकाम करून सिमेंटची भिंत उचलण्यात यावी आणि येथेच हा बाजार भरविण्यात यावा तसेच या बाजाराच्या आजूबाजूला तार कंपाऊंड केलेले आहे त्यामुळे गावातील तेथे राहणाऱ्या लोकांना कोणताही त्रास आजवर झालेला नाही आहे जवळपासच्या या परिसरात खामगाव,आसलगाव आणि वरवट बकाल असे एकूण तीन ठिकाणीं गुरांचा बाजार भरत असतो प्रत्येक ठिकाणी बैलबाजारात काँग्रेड चे बेड तयार केलेले आहे येथे मात्र दुर्लक्ष आणि जागा बदलण्याची दिशा मिळत आहे अशी चर्चा लोकांमध्ये ,गावकरी आणि व्यापारी वर्गामध्ये होत आहे शनिवारचा बैलबाजार हा वरवट गावांसाठी सणापेक्षा कमी नाही हा बाजार येथून हलवून संग्रामपूर येथे भरवणार या कारणाने वरवट बकाल गावकऱ्यांमध्ये दुं खाचे डोंगर कोसळल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही वरिष्ठांनी व कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर यांनी लोकांच्या भावना दुखावू नये व वरवट बकाल येथेच हा गुरांचा बैलबाजार भरविण्यात यावा अशी चर्चा लोकांमध्ये होतं आहे.

Previous articleभरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या रोडवर पलटया
Next articleप्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड टाकली कात 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here