Home उतर महाराष्ट्र पांझराकान साखर कारखाना २०२२/२३ ला नव्या यंत्रसामुग्री ने होईल सज्ज विकासशील ध्येय...

पांझराकान साखर कारखाना २०२२/२३ ला नव्या यंत्रसामुग्री ने होईल सज्ज विकासशील ध्येय नाशिकचे उद्योजक -पवन मोरे

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0024.jpg

पांझराकान साखर कारखाना २०२२/२३ ला नव्या यंत्रसामुग्री ने होईल सज्ज विकासशील ध्येय नाशिकचे उद्योजक -पवन मोरे

वासखेडी/साक्री दिपक जाधव युवा मराठा न्युज नेटवर्क – तालुक्याचा बंद असलेला पांझराकान साखर कारखाना नविन यंत्राच्या सहाय्याने चालु होण्यास होईल सज्ज ,आपल्या अथक प्रयत्नाला यश प्राप्त करत ,स्पर्श शुगर इंडस्ट्रीजचे मालक उद्योजक पवन मोरे,धनंजय अहिरराव यांच्या पाठपुराव्यानंतर पांझराची नवी दिशा ठरवतांना व चालु होण्याच्या मार्गाला हिरवा कंदील देत असुन येत्या सन २०२२/२३साठी पांझराकान परीसरातील बेरोजगार तरूणांना कमविण्यासाठी एक संधी देखील प्राप्त करून दिली ,असे मत उद्योजक मोरे यांनी व्यक्त केले,२०२२/२३ला नव्या यंत्राच्या सहाय्याने आपल्या भूमिपुत्रांच्या ,बळीराजासाठी, बेरोजगारांसाठी,मोठ्याने नव्या उमदीने सुरू होण्यास सुरुवात होईल ,यासाठी प्रत्येकाने आम्हांला सहकार्य करून पांझराला नवी दिशा द्यावी ,अशी माहीती उद्योजक पवन मोरे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले,
प्रसंगी प्रमुख विषय स्पर्श शुगर नाशिक व शिखर बॅक यांच्यात २५वर्षासाठी भाडेतत्वावरील करारनाम्यात करण्यांत आले, यासाठी कारखान्याची २८७ एकर जमीनीचा देखील यावेळेस देण्यांत आला, यावेळी मोरे म्हणाले की,पहिल्या वर्षी ५२लाख रूपये भाडे असुन दुसऱ्या हंगामांत एक कोटी रूपये असे टप्याटप्याने भाडेकरार करण्यांत आला, कारखान्याची पुर्वीची जुनी यंत्रसामुग्री निकामी असल्यामुळें ती काहीएक उपयोगात येणार नसल्याने नविन यंत्रसामुग्री बसवण्यात येऊन जुनी यंत्रसामुग्री शिखर बॅकेच्या ताब्यात देण्यात येईल,व नविन यंत्रसामुग्री आणली जाणार आहे, कारखान्याची मालकीची असलेली एकुण २८७एकर जमिनीवर साखर कारखान्यासह सौर पैनल चा व इतर शेतीपुरक उद्योगही उभारण्यांत येतील असे ही यावेळी सांगण्यांत आले,अशावेळी बेरोजगारांना उद्योग तसेच शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल,तालुक्यातील कुशल कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यांत येईल,पांझराकान कारखान्याची प्रशासकीय माहीती,जिल्हाधिकारीव बॅकेचे अधिकारी यांच्याशिवाय इतरांना देणे बंधनकारक नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, यावेळी धनंजय अहिरराव, साक्री पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र मराठे,मनसेचे संघटक धीरज देसले,आदी उपस्थित होते,
स्पर्श शुगर इंडस्ट्रीजचे मालक, उद्योजक पवन मोरे यांनी तालुक्यातील पांझराकान साखर कारखाना सुरु होण्यासाठी शिखर बॅकेशी करारनामा करून साक्रीकर भुमीपुत्रांना व शेतकरी बांधवांना तसेच बेरोजगार तरूणांसाठीचे ध्येय गाठत शेवटी पांझराकान लवकरच सुरू होईल हीच भुमिका कायम ठेवली,या परीस्थितीत साक्रीकरांच्या चेहऱ्यावर अपेक्षित आनंदाचा जल्लोष बघावयास मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here