Home बुलढाणा _बुलढाणा लोकसभा मतदानासाठी यंत्रणा सज्ज”_

_बुलढाणा लोकसभा मतदानासाठी यंत्रणा सज्ज”_

72
0

Yuva maratha news

1000313787.jpg

_बुलढाणा लोकसभा मतदानासाठी यंत्रणा सज्ज”_

_■ शहरी ३८१,ग्रामीण १५८१ असे १९६२ मतदान केंद्र ११ हजार अधिकारी,५ हजार पोलीस तैनात_

_■ मतदान केंद्राच्या ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आले असून १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे._

_■ मतदान ओळखपत्राशिवाय आधार कार्ड,मनरेगा जॉब कार्ड,बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहन चालक परवाना,पॅन कार्ड,रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट,छावाचित्रासह पेन्शन दस्तऐवज,केंद्र,राज्य सरकार,सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओंळपत्र,खासदार,आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळपत्र,भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे १२ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे._

_बुलढाणा; ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ -भारत निवडणूक आयोगाने दि.१६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार शुक्रवार,दि.२६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार १०४ ठिकाणी १ हजार ९६२ मतदान मतदान केंद्र राहणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली._

_बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यात १७ लाख ८२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यावेळी १८ ते १९ बर्षे बयोगटातील नव्याने नोंदणी केलेले २६ हजार ५०० मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे. या मतदार संघात ९ लाख ३३ हजार १७३ पुरुष,तर ८ लाख ४९ हजार ५०३ महिला आणि २४ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. यात दिव्यांग १४ हजार २३४,८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक २६ हजार ८३० तर ४ हजार ३९५ सैन्यदलातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील १ हजार १०४ ठिकाणी स्थापित १ हजार ९६२ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या सर्व मतदान केंद्रावर मतदारांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. याठिकाणी रांगबिरहीत मतदानासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांना रांगेत उभे ठेवण्याऐवजी बैठक बोपखे पाण्याची व्यवस्था करण्यात मतदान केंद्रालगत असलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये येणार आहे. त्यानंतर टोकन क्रमांकानुसार मतदानासाठी केवळ पाच मतदारांना रांगेत उभे ठेवण्यात येणार आहे. उष्ण वातावरणात मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी सुविधा पुरविण्यात येणार आहे. तसेच उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली सुविधा देण्यात येणार आहे._

_या मतदानासाठी एकूण १ हजार ९६२ मतदान केंद्र राहणार आहेत. यापैकी ३८१ शहरी तर १५८१ नागरी भागात मतदान केंद्र राहणार आहेत. यातील ९८७ मतदान केंद्राचे वेबकास्टींगद्वारे लाईव्ह स्वरूपात मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्राबर दिव्यांगांकरीता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सक्षम अॅपद्वारे व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानुसार या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्राशिवाय आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड,बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहन चालक परवाना,पॅन कार्ड,रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड,भारतीय पासपोर्ट,छावाचित्रासह पेन्शन दस्तऐवज,केंद्र,राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम,पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र,खासदार,आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र,भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे १२ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी कर्तव्यावर नियुक्त असणाऱ्या मतदान केंद्रावर त्यांना मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील कर्तव्यावर असलेल्या १ हजार १४९ अधिकारी,कर्मचारी पोस्टाद्वारे मतदान करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी डाक मतदान प्रक्रियेची सुविधा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात घरून मतदानाला रविवारपासून सुरूवात झाली आहे. यात दिव्यांग ६९२ आणि ८५ वर्षावरील २ हजार १७१ असे गृह मतदानासाठी नोंदणी केलेले एकूण २ हजार ८६३ मतदारांचे मतदान करण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ११ हजार ५९२ अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहे. तसेच ५ हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे._

_लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते दि.२६ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवसापर्यंत हे आदेश लागू राहतील. मतदान केंद्राच्या ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आले असून १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू आणि रोकड जप्त करण्यात येत आहे. यात आतापर्यंत १ कोटी ६० लाख रूपयांपर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात २५ लाखाहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांना मतदानाला येण्यासाठी आणि मतदान केंद्राबर सर्व सोयी पुरविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये निर्भयपणे सक्रीय सहभाग नोंदवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे._

Previous articleवाशीम जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे २६ एप्रिल रोजी मतदान होणार
Next articleनाशिकरोडला हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here