Home बुलढाणा मालवाहक वाहनाची दुचाकी स्वराला धडक, नंतर दवाखान्यात घेऊन जातो म्हणून नागरिकासमोर चालकाचा...

मालवाहक वाहनाची दुचाकी स्वराला धडक, नंतर दवाखान्यात घेऊन जातो म्हणून नागरिकासमोर चालकाचा गयावया, फक्त जरी दिले फेकून त्यात दुचाकी स्वराचा मृत्यू…..

117

आशाताई बच्छाव

1000341944.jpg

मालवाहक वाहनाची दुचाकी स्वराला धडक, नंतर दवाखान्यात घेऊन जातो म्हणून नागरिकासमोर चालकाचा गयावया, फक्त जरी दिले फेकून त्यात दुचाकी स्वराचा मृत्यू…..
जळगाव जामोद युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर निमखेडी ते सुनगाव मार्गावर मालवाहू वाहनाच्या धडकीमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. रस्त्यावर पडलेला दुचाकीस्वराला शहराला दवाखान्यात मध्ये घेऊन जातो अशी त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांसमोर गाडीच्या चालकाने गयावया केला आणि त्या दुचाकीस्वराला गाडीत मध्ये टाकून दवाखान्याच्या दिशेने निघाला मात्र जखमी अवस्थेत मध्ये असलेल्या दुचाकी स्वराला जंगलात फेकून दिले. यामुळे अपघातग्रस्त इसमाचा उपचाराभावी करुण अंत झाला.

माणुसकीला काळिमा फासणारी व क्रूरतेचे प्रदर्शन करणारी ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल परिसरात घडली. जळगाव जामोद पोलीस ठाणे हद्दीतील निमखेडी ते सुनगाव मार्गावर मालवाहू वाहन क्रमांक एम एच २७ बी ५३८२) च्या चालकाने दुचाकी (क्रमांक एम एच २८ एच ९१८९) ला धडक दिली. दुचाकीस्वार मनसाराम छत्तरसिंग वासकले (राहणार मेंढामारी) हा गंभीर जखमी झाला. यावर चालकाने गयावया करून जखमीला तातडीने दवाखान्यात नेतो अशी तिथे जमलेल्या सर्व नागरिकांना सांगितले व चालकाने त्याला वाहनामध्ये टाकले.मात्र बुऱ्हाणपूर मार्गावरील शांतीलाल सस्त्या यांच्या शेतालगतच्या निर्मनुष्य जंगलात फेकून दिले. जखमीला उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान मृताचा भाऊ गमदास छत्तरसिंग वासकले यांनी जळगाव जामोद पोलिसात फिर्याद दिली. जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी चालका विरोधात कलम २७९, ३३७, ३०४, २०१ भांदवी सह १३४, १८६ मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एपीआय’ इंगळे, जमादार प्रेमसिंग पवार हे पुढील तपास करीत आहेत.”

Previous articleमलकापूर तालुक्यात व-हाडीना लुटले, दिड लाखांचा ऐवज लंपास
Next articleअखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीची भोकरदन तालुका महिला आघाडी पदाधिकार्यांची कार्यकारिणी जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.