आशाताई बच्छाव
”
मलकापूर युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर लग्नाचा कार्यक्र आठपल्यानंतर कुटुंबासह घर परत येत असतांना देवधाबाभालेगाव रोडवरील संत मुक्ताईबाई मंदिराजवळ अडवून लोखंडी रॉडने व, गुप्तीने मारहाण करीत दीड लाख रूपयांचे दागिणे हिसकावून घेतल्या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून ८ जणांविरूध्द मलकापूर ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये 2 मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी भुषण गोकुळ थोरात रा. मलकापूर ग्रामीण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी व माझे वडील गोकुळ थोरात,आई वैशाली थोरात व भाऊ अमर थोरात आम्ही दोन दुचाकीने देवधाबा येथे नातेवाईकाकडे लग्न असल्याने गेलो होतो. लग्न लाऊन परत येत असतांना सायंकाळी ५.३० वाजे दरम्यान भालेगाव येथील मुक्ताई मंदिराजवळील टर्निग जवळ आमच्या गाडीसमोर एकाने मोटार सायकल आडवी लावली. त्यावर तिघे जण बसले होते. त्यामधील अरविंद सोळंके याला मी ओळखत असून त्याने तलवार काढली तर इतरांना मी ओळखत नाही. दरम्यान तिसरीही मोटार सायकल तेथे आली त्यावरही दोनतिन जण बसले होते. त्यातील देव ठाकूरला मी ओळखतो तर त्याच्या हाती गुप्ती होती. तर याचवेळी तिसऱ्या मोटार सायकलवर सुद्धा दोघे जण आले. यावेळी उपरोक्त मोटार सायकलवरील आठही जणांनी मला, माझ्या वडीलांना, आईला व भावाला गुप्ती, लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच माझ्या आईच्या गळ्यातील दोन तोळ्याची पोत अंदाजे किं. १ लाख रू. वडीलांच्या हाता तील १० ग्रॅमच्या २ सोन्यांच्या अंगठ्या अंदाजे किंः ५० हजार रूपये असा ऐवज जबरदस्तीने काढून घेत पळून गेले. या तक्रारीवरून पोलिसांनी अरविंद सोळंके, देव ठाकूर व इतर सहा जणांविरुध्द अप. क्र. ०१२२/२४ कलम ३९७, ३४१, २९४, ३१५. ५०४, ५०६, शस्त्र अधिनियम २५, ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे”






