आशाताई बच्छाव
अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीची भोकरदन तालुका महिला आघाडी पदाधिकार्यांची कार्यकारिणी जाहीर
माहोरा प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीची बैठक पिंपळगाव रेणुकाई येथे पार पडली.या बैठकीत भ्रष्टाचराविरुद्धच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री. कृष्णा लहाने जिल्हा अध्यक्ष जालना, श्री. मुरलीधर डहाके जिल्हा सचिव जालना, श्री. रामदास पाटील कदम जाफराबाद तालुका अध्यक्ष, श्री. बालासाहेब देशमुख भोकरदन तालुका अध्यक्ष, श्री. शालिकराम आहेर भोकरदन तालुका संपर्क प्रमुख, श्री.हरीश सपकाळ माजी सैनिक या बैठकी मध्ये उपस्थित होते दीनांक 30/ 04/2024 रोजी भोकरदन तालुक्यातील भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची महिला आघाडी कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये १)ज्योती मनोहर बोर्डे -महिला आघाडी भोकरदन तालुका अध्यक्ष, २)रुपाली राजेश अंकुळवोकर-महिला आघाडी भोकरदन तालुका उपाध्यक्ष, ३)मनुजा हरीबा सपकाळ-महिला आघाडी तालुका संघटक, ४)करुणा सागर हिवरे – महिला आघाडी तालुका सचिव,५) मुक्ता संजय मोरे – महिला आघाडी तालुका सह संघटक, ६)कल्पना रवींद्र सोनोने – महिला आघाडी तालुका संपर्क प्रमुख, ७)साधना अनिल सोनूने – महिला आघाडी भोकरदन शहर अध्यक्ष यांची जिल्हा अध्यक्ष कृष्णा लहाने व जिल्हा सचिव मुरलीधर डहाके यांच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.