Home Breaking News पालघर रिपाई च्यावतीने कोकण पूरग्रस्त भागात मदतीचा हात.

पालघर रिपाई च्यावतीने कोकण पूरग्रस्त भागात मदतीचा हात.

147
0

पालघर रिपाई च्यावतीने कोकण पूरग्रस्त भागात मदतीचा हात.

वैभव पाटिल विभागीय संपादक 

मा.ना. रामदासजी आठवले साहेब, सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार, व मा.श्री. सुरेशदादा बरशिंगे, निरीक्षक पालघर ठाणा यांच्या सूचनेनुसार आज दिनांक ३० जुलै२०२१ रोजी रिपाई (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बहुतेक जिल्ह्यात अनेक लोकांची शेती , घरे-दारे , फळबागा उध्वस्त झाल्या तसेच अतिवृष्टीमुळे दरडी कोसळुन व पुरामुळे बरीच लोकं व हजारो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत बहुतेक जिल्ह्यात अशी भयावह परिस्थिती उद्भवली असताना अत्यावश्यक साधन सामग्री ( सर्व प्रकारची औषधे, मोजे, बिस्किटे, पीठ-मीठ, चादरी ब्लँकेट, ह्यांडवॉश , कपडे ) रिपाई (आ)च्या वतीने एक मदतीचा हात म्हणुन रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपुर या ठिकाणी महावीर कुरिअर व इतर कुरिअर मार्फत पाठविण्यात आले या प्रकारचे निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना मा. जिल्हाधिकारी पालघर यांना निवेदन देण्यात आले. साधन सामग्री ची आहे तसेच अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी यांचे फार मोठे नुकसान झाले आहे अश्या लोकांना तलाठी मार्फत सर्वे करून त्यांची नुकसान भरपाई लवकरात – लवकर देण्यात यावी या मागणीचे सुध्दा निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब पालघर यांना देण्यात आले तसेच भविष्यात महाराष्ट्रात कुठेही अश्या प्रकारची परिस्थिती उद्भवली तर रिपाई (आ) पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आयु. सुरेश जाधव व त्यांची संपूर्ण टीम प्रत्येक वेळी मदतीचा हात देऊन खारीचा वाटा उचलेल या समयी मा.सुरेश जाधव (जिल्हाध्यक्ष पालघर), सौ.रोहिणी गायकवाड (महिला अध्यक्षा पा जि) , कुंदन मोरे (उपा. पा जि.) , शुभांगी राठोड (समाजसेविका) , सोमनाथ धनगवकर (सचिव) , पुष्कराज फुलारा (जिल्हा संघटक) , शरद जाधव (युवा अध्यक्ष पा ता) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमहाड पूरग्रस्तांसाठी आरोग्य सेवा
Next articleउंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती उत्साहात साजरी..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here