Home मराठवाडा कृषी विद्यापीठातील पंचवीस एकर जागा क्रीडा संकुलाला देण्याची खासदार संजय जाधव यांची...

कृषी विद्यापीठातील पंचवीस एकर जागा क्रीडा संकुलाला देण्याची खासदार संजय जाधव यांची मागणी

215
0

राजेंद्र पाटील राऊत

कृषी विद्यापीठातील पंचवीस एकर जागा क्रीडा संकुलाला देण्याची खासदार संजय जाधव यांची मागणी

परभणी/ शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

परभणी जिल्ह्यातील खेळाडूंना सुसज्ज असे क्रीडा मैदान नसल्यामुळे खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याची दखल घेऊन खासदार संजय जाधव यांनी नवीन क्रीडा संकुल साठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील 25 एकर एवढी जागा देण्याची मागणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे
परभणी शहरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानाची अवस्था अत्यंत खराब आहे पावसाळ्यात या स्टेडियममध्ये तळ्याचे स्वरूप येते तसेच स्टेडियमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मोडतोड झालेली आहे अनेक वर्षापासून या स्टेडियमची दुरुस्ती सुद्धा झालेली नाही तसेच उपलब्ध असलेले हॉल्स हे रिकामे आहेत कारण खेळाडूंना लागणारी सुविधा या स्टेडियम मैदानावर नाहीये हो असुविधेच्या कारणामुळे उदयन्मुख खेळाडू तयार होण्याचे वातावरण या ठिकाणी मिळत नाही याचा परिणाम परभणी जिल्ह्यातील नवीन खेळाडूंवर होत आहे त्यामुळे परभणी जिल्ह्याकरिता नवीन क्रीडा संकुल ची अत्यंत आवश्यकता आहे भव्य असे क्रीडा संकुल उभारण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील 25 एकर जागा ही क्रीडासंकुलासाठी हस्तांतरित करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केली आहे भव्य क्रीडा संकुल झाल्यास जिल्ह्यातील खेळाडूंना तयार होण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळणार आहे…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here