Home कोल्हापूर पेठ वडगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा तात्पुरता रद्द

पेठ वडगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा तात्पुरता रद्द

281
0

राजेंद्र पाटील राऊत

पेठ वडगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा तात्पुरता रद्द

कोल्हापूर 🙁 राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क ) पेठ वडगाव शहरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार होता शहरांमध्ये अतिशय सुंदर वातावरण होते आपल्या लाडक्या राजाचा पूर्णाकृती पुतळा
शहरात उभा राहणार म्हणून बऱ्याच वर्षापासून चे असणारे वडगाव वाशियांचे असलेले स्वप्न आज पूर्ण होणार होते परंतु जिल्हाधिकारी यांनी 144 कलम लागू केल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले किरीट सोमय्या तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊ शकले नाहीत परंतु महाराजांचा पुतळ्याचा लोकार्पण सोहळा रद्द होण्यास किरीट सोमय्या यांना वडगाव वासीय जबाबदार ठरवत आहेत. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रात्रभर पुतळ्याच्या सजावटीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. तर पुतळा परिसरात विविध पक्षांनी डिजिटल फलक लावल्याने वातावरण निर्मिती झाली होती वडगाव व वडगाव परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. सोमवार पहाटे पाच पासून मंगळवारी रात्री बारापर्यंत जमावबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला. पोलीस निरीक्षक घोळवे यांनी तात्काळ याबाबत नोटीस कार्यक्रमाच्या आयोजकांना लागू केली. व कार्यक्रम ठिकाणी पोलीस प्रशासन फौजफाट्यासह ठाण मांडून बसले होते. तात्काळ नगराध्यक्ष माळी त्यांनी सोशल मीडिया वरून कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here