लासलगावः(प्रविण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज
येथील भारतीय स्टेट बँकेत शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळत नसल्याची तक्रार दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांच्याकडे करण्यात आल्यानंतर भारती पवार यांनी थेट बँकेत जाऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत शेतकऱ्यांना त्रास झाल्यास ते खपवून घेणार नाही यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा खासदार भारती पवार यांनी दिला आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या लासलगाव शाखेमध्ये शेतकऱ्यांना पिक कर्ज वेळेवर मंजुरी मिळत नाही, शेतकऱ्यांशी अधिकारी वर्गाची कायमची होणारी अरेरावी, काही शेतकऱ्यांच्या फाईल फेकून देण्याचे प्रकार येथे घडले होते शेतकऱ्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्याची मजल येथील काही अधिकाऱ्यांची गेली होती या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी येथील पंचायत समिती उपसभापती शिवा पाटील सुरासे यांच्याकडे तक्रार केली होती.
लासलगाव दौऱ्यावर दिंडोरी चा खा भारती पवार या आलेल्या असताना शिवा सुराशे यांनी भारतीय स्टेट बँक बँकेच्या वागणुकीबद्दल चा पाढा खासदार यांना वाचून दाखवल्यावर खा. भारती पवार यांनी तातडीने याची गंभीर दखल घेत बँकेत भेट देऊन पाहणी केली असता अधिकाऱ्यांची गुर्मी जैसे थे होती.
या अधिकार्यांची भारती पवार यांनी चांगली कानउघडणी करत शेतकऱ्यांना त्रास दिल्यास त्याची गंभीर कारवाई केली जाईल व वरिष्ठांकडे याबाबत तातडीने पाठपुरावा केला जाईल असा इशारा त्यांनी सर्व अधिकारी वर्गाला यावेळी दिला.भारतीय स्टेट बँकेच्या लासलगाव शाखेत या वेळी खा.भारती पवार, उपसभापती शिवा पाटील सुराशे,लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप,शेतकरी शंकरराव शिंदे,चांगदेव शिंदे,दत्ता मापारी, सुरेश चव्हाण शांताराम निफाडे,किरण आमले यांच्यासह लासलगाव ,टाकळी,खडकमाळेगाव,देवगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
